दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
कोल्हापूर : जिल्हाधिकारी म्हटल्यानंतर सर्वसामान्यांच्या मनामध्ये एक भीतीचे वातावरण असते .पण सर्वसामान्यांच्या मनातील ही भीती कमी करत कोल्हापूरचे नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी विना चिठ्ठी सरळ आपल्या भेटीसाठी सर्वसामान्यांना परवानगी देऊन एक चांगला निर्णय घेतल्यामुळे 'आम्ही कोल्हापुरी फाउंडेशन' व 'आम्ही कोल्हापुरी साप्ताहिक' परिवाराच्या वतीने शुक्रवार दि.२९ ऑक्टोंबर रोजी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी मा. राहुल रेखावार यांची भेट घेऊन त्यांचा मानाचा कोल्हापुरी फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी शरद काटकर यांनी त्यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. आम्ही कोल्हापुरी फाउंडेशनचे अध्यक्ष भारत धोंगडे यांनी प्रास्ताविक केले. सेवानिवृत्त गटविकास अधिकारी गणेश सावंत , सामाजिक कार्यकर्ते रमेश कामत , न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे सेवानिवृत्त शाखाधिकारी अरुण घाटगे, दैनिक पुढारीचे पत्रकार भाऊसाहेब सकट आदी उपस्थित होते.