केंद्रीय तपास यंत्रणांची विश्वासार्हता धोक्यात... माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणदैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 कोल्हापूर - केंद्रीय तपास यंत्रणांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. तोडपाणी करण्यासाठी धाडी टाकल्या जातात की काय ही शंका आहे. या पद्धतीने जाणीवपूर्वक धाड सत्रातील इवेंट केला जातो.तोडपाणीसारख्या प्रकाराला शंका घ्यायला वाव मिळतो, अशाने तपास यंत्रणांची विश्वासार्हता शिल्लक राहणार नाही. एखादा दोषी आहे, हे न्यायलया सामोर सिद्ध न करता केवळ प्रसिद्धीसाठी धाड प्रकिया सुरु आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. आज कोल्हापुरात ते बोलत होते.

ते म्हणाले, कोविडच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लोकांना कोरोना लस विकत घ्यायला भाग पाडले. कोरोना लसींची किंमत वाढवली ही मोदी सरकारची अक्ष्यम चूक आहे. केंद्र सरकारने लस विकत घेऊन ती राज्यांना विकत दिली असती तरी चालले असते. कोविड लसीकरण ही केंद्र सरकराची जबाबदारी आहे. मोदी सरकराने ही जाहिरातबाजी थांबवावी असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

ते म्हणाले, जगातील प्रत्येक देशाने कोविड लस मोफत दिली. परंतु कुठेही देशाच्या पंतप्रधान किंवा राष्ट्रध्यक्षांचा फोटो छापला नाही. मोफत लसीकरण ही केंद्र सरकराची जबाबदारी आहे. मात्र लसीकरणाची ही जाहिरातबाजी मोदी सरकराने थांबवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. अनेकांनी यावरून मोदींचा फोटो काढवा अशी मागणी केली आहे. लसीकरण हा इव्हेंट नाही ती एक प्रक्रीया आहे. फोटो छापायचे आदेश कुणी दिली याची चौकशी व्हावी. यापुढे तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण करणार का? हे केंद्र सरकारने जाहीर करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या वेळी ते म्हणाले, मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था ढासळली आहे. विकास दर घसरला आहे. कोविड-१९ च्या आधीपासून अर्थव्यवस्थेला गळती लागली आहे. डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढले आहेत. यातून विकासात विषमता निर्माण झाली आहे. जागतिक पातळीवरील उपासमारीचा आलेख काढला तर, त्यात ११६ देशांची वर्गीकरण केले जाते. ११६ देशांमध्ये भारताचा यात १०१ क्रमांक लागला आहे. जो याआधी ९० व्या क्रमाकांवर होता. पालकमंत्री सतेज पाटील हे कॉंग्रेसरचे कर्तुत्ववान नेते आहेत त्यांना भविष्य उज्जवल आहे. मी जर मुख्यमंत्री असतो तर सतेज पाटील कॅबिनेट मंत्री असते असेही ते एका प्रश्नावर म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post