क्राईम न्यूज : पाच वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे .


बालकाच्या मृतदेहावर हळद, कुंकू, गुलाल आढळून आल्याने 

हा नरबळीचा प्रकार असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 कोल्हापूर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका पाच वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या बालकाच्या मृतदेहावर हळद, कुंकू, गुलाल आढळून आल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.शाहुवाडी तालुक्यातील कापशी येथे आज (मंगळवारी) पहाटे हा प्रकार उघडकीस आला आहे.

कोल्हापूरमधील एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी सायंकाळी हा मुलगा मैदानावर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला, नातेवाईकांनी शोध घेतला पण तो सापडला नाही. अखेर मुलांच्या नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतली व मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. सोमवारी देखील नातेवाईकांनी मुलाचा शोध घेतला पण त्याचा काहीच पत्ता लागला नाही.आज (मंगळवारी) पहाटे मुलाचा मृतदेह आढळून आला. मुलाच्या मृतदेहावर हळद, कुंकू, गुलाल टाकण्यात आला असून, हा नरबळी असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post