क्राईम न्यूज : एकमेकांकडे बघण्याच्या कारणातून पाठलाग करून झालेल्या तलवार हल्ल्यात तरूण गंभीर जखमीदैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

कोल्हापूर: एकमेकांकडे बघण्याच्या कारणातून पाठलाग करून झालेल्या तलवार हल्ल्यात तरूण गंभीर जखमी झाला. अक्षय रवींद्र यादव (वय २५, रा. रविवार पेठ) असे जखमींचे नाव आहे.अंबाई टँक परिसरात भरदिवसा आज सकाळी हा प्रकार घडला. जखमीला सीपीआर व तेथून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी तिघा संशयितांवर जुना राजवाडा पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,

अक्षय यादव हे रविवार पेठेत राहतात. ते अंबाई टँक समोरील एका हॉटेलमध्ये काम करतात. त्यांचा रविवार पेठेत एकमेंकाकडे बघण्यावरून वाद झाला होता. हा वाद मिटविण्यात आला होता. आज सकाळी साडेआकराच्या सुमारास हॉटेलमध्ये काम करत होते. त्यावेळी दोन मोटारसायकलवरून तिघे संशयित तरूण हातात तलवारी घेऊन तेथे गेले. त्याना पाहून अक्षय यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना तिघा संशयितांनी रंकाळा पदपथ उद्यानाजवळ पाठलाग करून गाठले. त्यानी त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. यात त्यांच्या डोक्याला, हाताला आणि कानाला गंभीर दुखापत झाली. त्यांनतर ते तिघे तेथून निघून गेले. जखमी अक्षय यांना हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याने दुचाकीवरून सीपीआरमध्ये दाखल केले.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अरविंद कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांनी परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला होता.

Post a Comment

Previous Post Next Post