दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
कोगनोळी ता. 20 : येथील ग्रामदैवत श्री अंबिका मंदिर, श्री राम मंदिर, मुरलीधर मंडप येथे कोजागिरी पौर्णिमा उत्साहात पण साधेपणाने साजरी करण्यात आली. यानिमित्त मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मुरलीधर मंडप येथे पांडुरंग काजवे महाराजांच्या मार्गदर्शनाखाली उध्दव काजवे महाराजांच्या हस्ते आरती केली. यावेळी सूरदास गायकवाड, उपेंद्र काजवे, मुकुंद वठारे, वासुदेव आंबी, हरिदास आंबी, बाबासाहेब वडर, यशवंत जाधव, दादासाहेब मानगावे उपस्थित होते.
राम मंदिर येथे ट्रस्टचे अध्यक्ष उमेश पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली. धार्मिक पुरोहित सुभाष सुळगाडे यांनी केले.
यावेळी महेश पाटील, शिवेंद्र पाटील, अशोक आलासे, मारुती पाटील, उत्तम पाटील, कुमार पाटील, प्रशांत मेंगाणे, सुनील वरुटे उपस्थित होते.
अंबिका मंदिरात सकाळी अनिल गुरव, सचिन गुरव यांच्या हस्ते देवीला अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली. संध्याकाळी अकरा वाजता मानकरी व ग्रामस्थांच्या उपस्थित देवीची आरती करण्यात आली. देवीला मसाले दुधाचा नैवेद्य दाखवण्यात आला.
यानंतर देवीची पालखी सवाद्य मिरवणूक काढून सबिना काढण्यात आला. यानंतर उपस्थित भाविकांना दुधाचा महाप्रसाद वाटप केला. सर्व धार्मिक कार्यक्रम पार पाडण्यासाठी आप्पासो मगदूम, अमोल आवटे, संदीप चौगुले, संजय गुरव, अभिजीत आवटे, आर के नवाळे, बाबासाहेब जनाप पाटील, बाळासाहेब गुरव, बाबासाहेब पाटील, महावीर मगदूम, राजू इंगवले, तुकाराम पाटील, संभाजी जगदाळे, श्याम पाटील, अशोक वंदुरे, नरसु पाटील, अनिल पाटील, अनिल कोरवी, धोंडीराम कोरवी यांच्यासह मानकरी, आंबी, गोंधळी, दिवटे यांनी परिश्रम घेतले.
फोटो :
कोगनोळी : येथे ग्रामदैवत श्री अंबिका देवीची कोजागिरी पौर्णिमा निमित्त काढलेला पालखी सबिना (छायाचित्र अ�