दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा ;
अजिंठा:- उसतोडीसाठी मजुर पुरवण्याचे सांगून बीड जिल्हयातील उसतोड मुकादमाचे सव्वादोन लाख रुपये घेवून पोबारा करण्याऱ्या दोघांना अजिंठा पालिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी एक लाख तीस हजार रुपये हस्तंगत केले असून त्यांचा एक साथीदार फरार आहे.
या विषयी अजिंठा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित विसपुते यांनी सांगीतले की, या विषयी सदाशिव साहेबराव गडदे रा. शेकटा ता.गेवराई जि.बीड यांनी फीर्याद दिली की, जामनेर तालुक्यातील नाजीम शामद तडवी रा . हिवरखेडा, सुपडू शमशेद तडवी रा . जाभळे तसेच बशीर नसीर जडवी रा . तोंडापूर यांनी मला उसतोडणीसाठी मजुर लागत असल्याने वरील तिघांनी मला संगनमत करून फोन द्वारे संपर्क करून तुम्हांला उस तोडणी साठी मजुर पुरवितो अशी बतावणी करून २६ सप्टेंबरला शिवना (ता. सिल्लोड ) जवळ आडगाव जाण्याऱ्या रस्त्यांवर बोलवून घेतले . व माझ्या कडील सव्वादोन लाख रुपये घेवून पोबारा केला . व माझी फसवणूक केली. अशी फीर्याद दिली . यावरून अजिठा पोलिस ठाण्यात २९ सप्टेबरला गुन्हा दाखल करण्यात आला .
या प्रकरणी पोलीस अधिक्षक निमित गोयल, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ पवन बनसोड, उपविभागिय पोलिस अधिकारी विजयकुमार मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंठा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित विसपुते, फौजदार राजु राठोड, सहकारी गजानन चव्हाण, अक्रम पठाण, प्रविण गवई, महिला पोलिस अस्माना पठाण, काळे यांनी तपास चंक्र गतीने फीरवून नाजीम शामद तडवी रा.हिवरखेडा ता. जामनेर, सुपडू शमशेद तडवी रा. जांभोळ, ता. जामनेर यां दोघांना ताब्यात घेतले तर बशीर नसीर तडवी चा शोध सुरू आहे .
अटक केलेल्या दोघांना न्यायालया पुढे उभे केले असता त्यां दोघांना दोन दिवसाची पोलिस कस्टडी देण्यात आली . त्यांच्या कडून पोलिसांनी एक लाख तीस हजार रुपये नाजीम तडवी कडून हस्तगत केले आहे.
*दरम्यान यातील आरोपितांची ऊस तोडणी मजूर पुरविणारे व्यक्तींना संपर्क करून त्यांना मजूर पुरवण्याचे आश्वासन देऊन त्रयस्थ ठिकाणी बोलावून पैसे लुबाडून मजूर न पुरविता पळून जाण्याची गुन्हे पद्धती आहे. प्रकारचे व्यवसायात असणारे नागरिकांनी भूलथापांना बळी न पडता खात्री व पडताळणी करूनच योग्य रीतीने आर्थिक व्यवहार सावधगीरीने करावेत असे आवाहन पोलीस निरीक्षक अजित विसपुते यांनी केले आहे.*