मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उद्याचा पुणे दौरा रद्द.


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखाध्यक्षांचे मेळावे अचानक रद्द करण्यात आले आहेत. पक्षाध्यक्ष राज ठाकरे संबोधित करणार असल्याने या मेळाव्यांबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.काही अपरिहार्य कारणामुळे मेळावा पुढे ढकलण्यात आल्याचे मनसे सचिव सचिन मोरे यांनी पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून जाहीर केले आहे.

मुंबईतील भांडुप येथे शनिवारी, तर रविवारी पुण्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे शाखाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे नियोजन करण्यात आले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजारी असल्याने हा मेळावा रद्द करण्यात आल्याचे समजते.

दरम्यान, लवकरच हे दोन्ही मेळावे पुन्हा एकदा आयोजित केले जातील, असे मनसेतर्फे जाहीर करण्यात आले आहे. मध्यंतरी अयोध्येतील संतमहंतांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेत अयोध्या भेटीची निमंत्रण दिले होते. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलतात, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजारी असल्याने हा मेळावा रद्द करण्यात आल्याचे समजते.

Post a Comment

Previous Post Next Post