दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
देशात दिवसें दिवस इंधनाचे दर वाढत असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी उच्चांकी पातळी गाठली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 108.19 रुपये तर डिझेल 98.16 रुपये प्रति लिटर झाले आहे. सततच्या दरवाढीमुळे सर्वसामानयांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.
पेट्रोलच्या किमतीत 25 पैसे व डिझेलच्या किमतीत 30 पैशांची वाढ झाली असून सरकारी कंपन्यांकडून झालेली ही सलग तिसरी दरवाढ आहे.आंतराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढल्यामुळे सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या आहेत. इंधन दरवाढीची गेल्या सात दिवसांतील ही सहावी वेळ आहे. गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर 78 यूएसडी प्रति बॅरल इतके झाले आहेत. त्याचा फटका देशातील इंधन दरवाढीला बसला आहे. दिल्लीत पेट्रोल 102.14 रुपये लिटर, डिझेल 90.47 रुपये प्रति लिटर झाले आहे. सतत वाढणाऱ्या दरांमुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे.