समीर वानखेडेना वर्षभरात तुरंगात टाकणार..नवाब मलिक .

 


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एकेरी उल्लेख करत, 'तुला तुरुंगात टाकल्या शिवाय शांत राहणार नाही' असं वक्तव्य केलंय.आर्यन खान प्रकरणानंतर नवाब मलिक यांनी एनसीबीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आज पिंपरी चिंचवड मध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना नवाब मलिक यांनी वानकेडेंवर आरोप करत एनसीबीच्या कारवाईबद्दल गंभीर आरोप केले आहेत,

एनसीबी करत असलेल्या कारवाईची प्रकरणं बोगस आहेत, त्यांना आपण लवकरच एक्सपोज करू असं सांगत नवाब मलिक यांनी वर्षभराच्या आत तुझी नोकरी जाईल असं गंभीर वक्तव्य मलिक यांनी केलंय. नवाब मलिकच्या जावयाला तुरुंगात टाकताना वरून दबाव टाकणारा तुझा बाप कोण? तुला तुरुंगात टाकल्या शिवाय मी शांत राहणार नाही हे आव्हान असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय.

केंद्रीय यंत्रणांचा वापर करून हजारो कोटी रुपये वसूल करण्याचं काम केलं जातंय. हे अधिकारी आणि भाजपनेते लोकांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करताय, त्यांना लवकरच आपण एक्सपोज करू असंही ते पुढे म्हणाले. समीर वानखेडे हे बोगस आहेत, त्यांचे वडील बोगस होते, असंही ते म्हणाले. तसंच 'तुझ्यावर दबाव टाकणारे तुझे बाप कोण हे सांग' अशा शब्दात त्यांनी वानखेडेंवर टीका केली.

Post a Comment

Previous Post Next Post