एनसीबी'चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या २५ कोटींच्या लाचखोरीच्या आरोपाबाबत त्यांची 'एनसीबी'च्या दक्षता विभागा मार्फत चौकशी करण्यात येणार ..दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 मुंबई : आर्यन खान प्रकरणात 'एनसीबी'चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या २५ कोटींच्या लाचखोरीच्या आरोपाबाबत त्यांची 'एनसीबी'च्या दक्षता विभागा मार्फत चौकशी करण्यात येणार आहे.तर ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंचाने केलेल्या लाचखोरीच्या आरोपांना बेदखल करण्याची वानखेडे आणि एनसीबी यांची मागणी विशेष न्यायालयाने सोमवारी फेटाळली.

अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात आर्यन खान प्रकरणातील एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपानंतर याप्रकरणी एनसीबीकडून दक्षता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी एनसीबीचे पथक आज, मंगळवारी मुंबईत येण्याची शक्यता आहे. आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटींची लाच मागण्यात आली होती, त्यातील आठ कोटी वानखेडे यांना देणार होते, असा आरोप साईल यांनी केला आहे.

'एनसीबी'च्या गुन्ह्य़ासंदर्भातील साक्षीदार प्रभाकर साईल यांचे प्रतिज्ञापत्र आपण पुढील कार्यवाहीसाठी एनसीबीच्या महासंचालकांना पाठवत असल्याचे एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन यांनी रविवारी स्पष्ट केले होते. त्यानंतर याप्रकरणी एनसीबीचे महासंचालकांनी हे प्रकरण दक्षता विभागाकडे वर्ग केले असून याप्रकरणी दक्षता चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांनी सोमवारी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

दक्षता विभागाचे प्रमुख या प्रकरणात चौकशी करणार आहेत. त्यासाठी दक्षता पथक लवकरच मुंबईत येणार असल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले. या चौकशीचे पर्यवेक्षक सिंग असतील. या प्रकरणात एनसीबीकडून न्यायालयात एक प्रतिज्ञापत्रही सादर करण्यात आले आहे. दरम्यान, आर्यन खान प्रकरणात अभिनेत्री अनन्या पांडेला सोमवारी चौकशीला बोलवले होते, पण ती चौकशीला आली नाही.

क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच साईल यांनी केलेल्या लाचखोरीच्या आरोपांबाबतच्या प्रतिज्ञापत्रावर आक्षेप घेत ते बेदखल करण्याची वानखेडेंची मागणी विशेष न्यायालयाने सोमवारी फेटाळली. पंच साईल यांनी के लेले आरोप तपासात अडथळे निर्माण करण्याचा आणि तपास यंत्रणेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा करत त्याच्या प्रतिज्ञापची दखल घेऊ नये, अशी मागणी वानखेडे यांनी केली होती. ती फेटाळताना एनसीबीच्या मागणीच्या आधारे सरसकट आदेश देता येऊ शकत नाही, असे न्यायालयाने प्रामुख्याने नमूद के ले.

या प्रकरणी अटके त असलेल्या आर्यन खान याची प्रकरणातून सुटका करण्यासाठी वानखेडे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी २५ कोटी रुपयांची मागणी के ल्याचा आरोप साईल यांनी केला आहे. त्याबाबतचे प्रतिज्ञापत्रही त्याने तयार केले आहे. त्या पार्श्वभूमीवर एनसीबी आणि वानखेडे यांनी सोमवारी विशेष न्यायालयात स्वतंत्र अर्ज करत त्यांचे हे प्रतिज्ञापत्र ग्राह्य़ धरू नये, अशी मागणी के ली होती.

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी मात्र एनसीबी आणि वानखेडे यांना या प्रकरणी दिलासा देण्यास नकार दिला. न्यायालयाने आपल्या आदेशात, एनसीबीने अर्जाद्वारे मागितलेला दिलासा पाहता त्यादृष्टीने सरसकट आदेश देता येणार नाही. किं बहुना अशा प्रकरणात संबंधित न्यायालय आवश्यक त्या टप्प्यावर योग्य तो आदेश देऊ शकते, असे स्पष्ट केले.

शिवाय आर्यनसह या प्रकरणातील अन्य काही आरोपींनी जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका के ली असून ती प्रलंबित आहे. एकू णच हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे एनसीबीच्या मागणीच्या अनुषंगाने हे न्यायालय कोणाताही आदेश देऊ शकत नाही, असेही न्यायालयाने प्रामुख्याने नमूद केले.

Post a Comment

Previous Post Next Post