किरीट सोमय्या जरंडेश्वर कारखाना प्रकरणी आज दुपारी ईडीच्या अधिकाऱ्यांना भेटणार असल्याचं ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे.दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 मुबंई :  भाजप नेते किरीट सोमय्या मागील काही दिवसांपासून सतत महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावत आहेत. त्यांनी अजित पवार यांच्यावरही जरंडेश्वर कारखान्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप लावला होता.त्यानंतर किरीट सोमय्या आणि अजित पवार यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगलं होतं. आता पुन्हा किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी एक ट्विट केलं आहे.

जरंडेश्वर कारखाना प्रकरणी आयकर विभागानं अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी छापेमारी केली होती. त्यानंतर सोमय्या आणि पवार हा वाद अधिकच पेटत गेला. आता किरीट सोमय्या यांनी ते जरंडेश्वर कारखाना प्रकरणी आज दुपारी ईडीच्या अधिकाऱ्यांना भेटणार असल्याचं ट्विट करून सांगितलं आहे.

त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, 'दुपारी 2 वाजता मी जंरडेश्वर साखर कारखान्याचे संस्थापक आणि ईडीच्या अधिकाऱ्यांना अजित पवार यांच्या बेनामी भ्रष्ट व्यवहारासाठी भेटणार', असं ट्विट करून त्यांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे.

किरीट सोमय्या यांनी केलेल्या ट्विटनंतर सोमय्या आणि ईडी अधिकाऱ्यांच्या भेटीत काय चर्चा होणार? आणि त्यानंतर या प्रकरणाला काय वळण मिळणार? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शिवाय अजित पवार यावर काय भूमिका घेतात? याकडे सर्वाचं लक्ष लागलेलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post