पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...नवाब मलिक

 


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

मुंबई: ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी एक सूचक टि्वट केलं आहे, तसंच प्रतिक्रियाही दिली आहे. "आर्यन खानला आज जामीन मिळाला.यापूर्वी कोर्टाने दोन जणांना जामीन दिला होता" असे नवाब मलिक म्हणाले.

"लोक जास्त काळ तुरुंगात राहावे, त्यांच्या मनात भीती निर्माण व्हावी यासाठी NCB नेहमी प्रयत्न करत असते. ज्या अधिकाऱ्याने या मुलांना तुरुंगात टाकलं, आज तोच राज्य सरकारने कारवाई करु नये, म्हणून कोर्टात गेला" असे मलिक म्हणाले.

जेल मध्ये टाकणारा आता जेल मध्ये जायला घाबरत आहे? त्यांचा फर्जीवाडा आता समोर येत आहे. ज्या पोलिसांकडून सुरक्षा मागितली त्यांचीच भीती वाटतेय" असे नवाब मलिक म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post