आता लवकरच एसटी महामंडळाच्या गाड्यांमध्ये सीएनजी बसेस सामिल होणारदैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 मुंबई : इंधन दरवाढीने सामान्य नागरिक हैरान झाले असतानाच आता एसटी महामंडळालाही त्याचा फटका बसला असल्याचं दिसून येतंय. एसटी महामंडळाने नुकताच यासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.एसटी महामंडळाने इंधनाच्या वाढत्या दरामुळे 1,000 गाड्यांचं सीएनजीमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता लवकरच एसटी महामंडळाच्या गाड्यांमध्ये सीएनजी बसेस सामिल होणार आहेत.

कोरोना महामारीमुळे आधीच प्रवाशांची संख्या कमी झालेली होती. त्यातच इंधनाचा सातत्याने वाढत असलेला दर. यामुळे एसटी महामंडळाचं आर्थिक गणित पूर्णपणे ढासळल्याची परिस्थिती आहे. याच सर्व परिस्थितीचा विचार करून एसटी महामंडळाने त्यांच्याकडील 1,000 गाड्यांचं सीएनजीत रुपांतर करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली आहे.

परब म्हणाले, कोरोनाकाळात प्रवाशांची संख्या कमी झाल्याने एसटीच्या उत्पन्नावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. त्यातच डिझेलच्या दरातही सतत वाढ होत आहे. एसटी महामंडळाकडे सध्या 17 हजार बसेस असून या बसेसच्या डिझेलवर होणारा खर्च यापूर्वी एकूण खर्चाच्या 34 टक्के होता. मात्र तो खर्च डिझेलच्या दरवाढीमुळे 38 ते 40 टक्क्यांवर पोहोचला आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करूनच इंधनावरील गाड्यांचे सीएनजीत रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. असं त्यांनी सांगितलं.

             आकाश पोतदार यांचे दुःखद निधन

लवकरच एसटी महामंडळ सीएनजीबरोबरच इलेक्ट्रीक, एलएनजी या गाड्यांचा समावेश देखील एसटी महामंडळाच्या ताफ्यात करणार आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने या गाड्यांचा निर्णय फायद्याचा ठरणार आहे. शिवाय या गाड्यांमुळे डिझेलवरील गाड्यांवरही पर्याय उपलब्ध होणार आहे. पर्यावरणपूरक प्रवासाला एसटी प्राधान्य देणार असल्याचं अनिल परब यांनी सांगितलं. त्यादृष्टीने डिझेलवरील खर्चाची बचत करण्यासाठी इतरही पर्यायांचा विचार करण्याच्या सुचना परब यांनी दिल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post