समीर वानखेडे जन्माने मुस्लिम...(?). SC प्रवर्गावर मिळवलेली नोकरी काढून घ्यावी.:- डॉ. राजन माकणीकर

 


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

मुंबई दि (प्रतिनिधी) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे जन्माने मुसलमान असल्याचे दिसून आले असल्याने त्यांनी शासनाची दिशाभूल करून मिळवलेली नोकरी काढून घ्यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी केली आहे.

समीर वानखेडे यांनी अनुसूचित जातीचे बोगस प्रमाणपत्र मिळवून NCB ची नोकरी मिळवली असल्याचे समजत असून याप्रकरणी अनुसूचित आयोगाकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तक्रार दाखल करणार आहे.

गुरुवार 7 दिसेम्बर 2006 रात्री 8 वाजता समीर दाऊद वानखेडे  आणि शबाना कुरेशी यांचा निकाह लोखंडवाला कॉम्प्लेक्स अंधेरी पश्चिमेला झाला असून काजी मुजजमिल अहेमद यांनी समीर वानखेडे हे मुस्लिम असून त्यांचा निकाह लावल्याचे कबुल केले आहे.

मात्र; तत्पूर्वी जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत समीर वानखेडे यांना नोकरीतून कमी करून नजर कैदेत ठेवण्यात यावे म्हणजे चौकशी करिता सोपं होईल.

Post a Comment

Previous Post Next Post