हवामान खात्याकडून संपूर्ण महाराष्ट्राला येलो अलर्ट जारी करण्यात आलादैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

मुंबई : अरबी समुद्रात पुन्हा एकदा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. हवामान खात्याकडून संपूर्ण महाराष्ट्राला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.तसेच वीजा चमकत असताना बाहेर न पडण्याची विनंतीदेखील करण्यात आली आहे.

हवामान खात्याने आज राज्यात सर्वत्र पावसाचा इशारा दिला आहे. पुढील दोन ते तीन तासांत पुण्यासह मुंबई, पालघर, ठाणे, कोकण आणि घाट परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळणार आहेत. दरम्यान वेगवान वारे देखील वाहणार आहेत, पुढील २४ तास राज्यात अशीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान तज्ज्ञांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

फार क्वचित वेळा असे चित्र दिसते कि संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाट सहित पाऊस पडण्याची शक्यता.. severe weather warnings issued by IMD for coming 24 hrs in the state
Image

Post a Comment

Previous Post Next Post