खासगी बस व्यावसायिकांनीही तिकिटाचे दरात केली विक्रमी भाव वाढदैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 नागपूर : डिझेलच्या दरात सतत वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट  बिघडलेले असताना आता खासगी बस व्यावसायिकांनीही  तिकिटाचे दरात विक्रमी भाव वाढ केलेली आहे.

  त्यामुळे सर्वसामान्यांना खासगी बसच्या तिकिटांची महागड्या दराने खरेदी करावी लागत आहे. नागपूर ते पुण्यासाठीचे भाडे १२०० रुपयांवरून चार हजारावर गेल्याने अनेकांचे डोळे विस्फारले आहे.

  कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर कामानिमित्ताने बाहेरगावी गेलेल्या नागरिकांना दिवाळीसाठी गावी परतण्यासाठी अधिकचा खिसा हलका करावा लागणार आहे. कारण खासगी बस व्यावसायिकांनी तिकिटाचे दरात विक्रमी भाव केलेली आहे. नागपूरवरुन पुण्याला आणि पुण्यावरून नागपूरला येण्यासाठी पूर्वी एक हजार ते ११०० रुपये मोजावे लागत होते ते आता चार हजार रुपयावर गेले आहे.

  खासगी बसने नागपूर - पुणे-औरंगाबाद, जालना, कोल्हापूरसह इतर ठिकाणच्या प्रवासासाठी प्रत्येकी अडीच ते चार हजार रुपये मोजावे लागणार आहे. विमानाचे आणि बसचे भाडे एकच झाले आहे. पुणे येथील विमानतळाचे काम सुरू असल्याने विमानसेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे विमानाचे उड्डाण बंद असल्याने खासगी बस वाल्यांची संधीचे सोने करून घेण्यासाठी ऐतिहासिक भाववाढ केलेली आहे असे बोलले जात आहे.

  नागपूरवरून नांदेडला खासगी बसचे भाडे अन्य दिवशी ६०० रुपयांच्या आसपास असते. मात्र, दिवाळीच्या काळात हे भाडे १९०० रुपये करण्यात आले आहे. नागपूर ते पुणे या तिकिटाचा दर देखील तिप्पटीने वाढले आहे. इतर दिवशी ११०० रुपये प्रवाशांना ९०० रुपये द्यावे लागते. सुटीच्या काळात खासगी बसच्या भाड्यामध्ये वाढ होत असते. एसटी महामंडळाकडून सुटीच्या कालावधीत जास्त ट्रॅफिक असणाऱ्या मार्गावर एसी बसेस सोडण्यात येत नाहीत, त्यामुळे प्रवाशांना नाइलाजाने महागडी तिकिटे खरेदी करून खासगी ट्रॅव्हलचा आसरा घ्यावा लागतो.

  ट्रॅव्हल्सचे दिवाळीत असे राहणार दर - आधीचे दर दिवाळीतील स्थिती

  1) नागपूर ते नांदेड : ६०० - १९००

  2) नागपूर ते पुणे : १२०० - ४०००

  3) नागपूर ते औरंगाबाद : ८०० - ३०००

  4) नागपूर ते सोलापूर : १००० - २५००

  5) नागपूर ते हैदराबाद : ११०० -२७००

  कोरोनामुळे तब्बल दीड वर्ष ट्रॅव्हल्स बंद असल्याने मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. ती भरपाई म्हणून भाडे वाढ केलेली आहे असे अनेकांना वाटत असले तरी मुख्य कारण डिझेलची दरवाढ आहे. दिवाळीच्या दोन ते तीन दिवसाचा हा व्यवसाय आहे. त्यात थोड्या फार प्रमाणात झालेले नुकसान या दरवाढीने निघेल आणि आमचा वर्षभराचा खर्चाचा मेळ बसू शकणार आहे.- Travel Agent

Post a Comment

Previous Post Next Post