नवाब मलिक यांच्या विरोधात गु्न्हा दाखल .दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

 नवी दिल्ली : नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमध्ये आता मलिक यांच्या विरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वानखेडे यांची बहिण यास्मिन वानखेडे यांनी याबाबत पोलिसांत धाव घेतली असून समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकरनं याबाबत माहिती दिली.

राष्ट्रीय महिला आयोगाकडं धाव..

File pic

एएनआयच्या माहितीनुसार, एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची बहिण यास्मिन वानखेडे यांनी राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र लिहिलं असून आपल्या संविधानिक हक्कांचं संरक्षण व्हावं अशी विनंती त्यांनी पत्रातून केली आहे. त्याचबरोबर त्यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात पोलिसांत एफआयआर देखल करण्यासाठी तक्रार दिली आहे.

मलिकां विरोधात एफआयआर - क्रांती रेडकर

दरम्यान, समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरनेही नवाब मलिक यांच्यावर एफआय़आर दाखल केल्याची माहिती दिली होती. तिनं म्हटलं की, "आमचे खासगी फोटो शेअर करुन नवाब मलिक आपल्या संविधानिक शपथेच्या विरोधात वागत आहेत. आम्ही त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत. त्यांच्याविरोधात आम्ही एफआयआर दाखल केली आहे. सध्या मलिक यांचा समीर वानखेडे यांना पदावरुन हटवणं हा एकच अजेंडा आहे, कारण त्यांना त्यांच्या जावयाला वाचवायचं आहे"

Post a Comment

Previous Post Next Post