आणखी चार दिवस शहरांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याच्या पुणे वेधशाळेने र्वतविला आहे.      दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

      पुणे : शहरांत काल झालेल्या दिवसभराच्या उकाड्यानंतर सांयकाळनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. मेघगर्जना आणि वीजांचा लखलखाट रात्री उशिरापर्यंत सुरू हाेता. आणखी चार दिवस शहरांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याच्या पुणे वेधशाळेने र्वतविला आहे.


      गेल्या काही दिवसापासून शहरांत दिवसा तापमानात वाढ हाेत आहे. साेमवारी असेच वातावरण दिवसा हाेते, काल सांयकाळी पाचनंतर आकाशात ढग दाटून आले आणि मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. अर्धातास पावसाने पुणे शहराला झाेडपून काढले. दिवसभर ऊन असल्याने अनेक जण रेनकाेट, छत्री न घेताच घराबाहेर पडले हाेते. त्यांची या पावसाने फजिती केली. सुमारे अर्धा तास जाेरदार हजेरी लावल्यानंतर पावसाचा जाेर कमी झाला हाेता. रस्ते पाण्याखाली गेलेले, रस्त्याच्या दुतर्फाने पाणी वाहत असल्याचे चित्र शहरात दिसले. कार्यालयीन कामकाज संपण्याच्यावेळेस पाऊस पडण्यास सुरवात झाल्याने अनेक अडकून पडले हाेते. सांयकाळी सातनंतर पुन्हा एकदा पावसाने जाेर पकडला हाेता. पुढील चार दिवस याच पद्धतीने दिवसा आकाश अंशत: ढगाळ राहणार आहे. सांयकाळ नंतर आकाशत ढग दाटून मेघगर्जनेसह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. घाटमाथा क्षेत्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post