ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर महापालिकेची कोट्यवधी रुपयांची भूमी हडप केली ..महापौर सुनील कदम आणि माजी नगरसेवक सत्यजित कदम.दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

कोल्हापूर : - ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सत्तेचा अपलाभ उठवत कोल्हापूर महापालिकेची कोट्यवधी रुपयांची भूमी हडप केली आहे. या प्रकाराविषयी माहिती असूनही पालकमंत्री सतेज पाटील यांनी तक्रार देण्याचेही स्वारस्य दाखवले नाही.या संदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे तक्रार करणार आहे, अशी माहिती माजी महापौर सुनील कदम आणि माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सत्यजित कदम पुढे म्हणाले, ''वर्ष २००४ मध्ये मंत्री मुश्रीफ यांनी त्यांचा मुलगा साजिद याच्या नावे विकसन करारपत्र आणि वटमुखत्यारपत्र करून घेतले. त्या मिळकतीवर 'कल्पतरू'नावाची बहुमजली इमारत उभारण्यात आली. यातील बहुतांश सदनिका साजिद मुश्रीफ यांच्या नावांनी आहेत. ही भूमी मूलत: शासनाची असून ती हडप करण्यात आली आहे. या संदर्भात लोकशाहीदिनात तक्रार नोंद करण्याचा प्रयत्न केल्यावर त्याची नोंद घेण्यात आली नाही.''

Post a Comment

Previous Post Next Post