किरण गोसावी विरोधात आणखी चार तक्रारी पुणे पोलिसांकडे

 


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :


पुणे : नोकरीच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी नाट्यमयरित्या अटक करण्यात आलेल्या किरण गोसावी विरोधात आणखी चार तक्रारी  पुणे पोलिसांकडे आल्या आहेत. त्यांचीही नोकरीच्या आमिषाने फसवणूक केल्याचे सांगण्यात आले आहे.

एनसीबीच्या क्रुझवरील कारवाईनंतर प्रकाश झोतात आलेल्या किरण प्रकाश गोसावी (वय ३७, रा. वाशी, नवी मुंबई) पुणे पोलिसांनी अटक केली. फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली. या गुन्ह्यात कलम वाढ करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत चिन्मय देशमुख (वय २२) या तरुणाने २०१८ मध्ये तक्रार दिलेली आहे.

पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करत त्याला २०१९ मध्ये फरार घोषित केले होते. तर या गुन्ह्यात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. दरम्यान, एनसीबीने क्रूझ कारवाईदरम्यान पंच म्हणून नेले होते. त्यानंतर त्याने एक सेल्फी आर्यन खान सोबत काढली. त्यानंतर तो चर्चेत आला होता. दरम्यान, पूर्वीपासून पुणे पोलिसांचा फरार आरोपो असलेल्या किरण गोसावी याला पुणे पोलिसांनी गुरूवारी सकाळी कात्रज भागातून अटक केली. त्याला न्यायालयाने ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडे तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, पुणे पोलिसांकडे आणखी चार तरूणांनी किरण गोसावीने फसवणूक केली असल्याबाबत तक्रार केली आहे. संबंधित तरूण पोलिसांना भेटून गेले आहेत. तीन तरूण लष्कर परिसरातील असून, एक वानवडी परिसरातील आहे. त्यांना संबंधित पोलिस ठाण्यांना तक्रार अर्ज देण्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

    पुणे पोलीस गोसीवाला घेऊन मुंबईला

    फरासखाना पोलीस तपासासाठी किरण गोसावीला घेऊन मुंबईला रवाना झाले आहे. त्याचे घर तसेच ऑफिसची तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात कलम वाढ केली आहे. त्याचाही तपास केला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post