महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवाजीनगर मतदारसंघाच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन करण्यात आलेदैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

पुणे - केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या महागाईच्या विरोधात आज पासलकर गॅस एजन्सी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवाजीनगर मतदारसंघाच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन करण्यात आले.पेट्रोल, डिझेल व घरगुती एलपीजी गॅसच्या वाढत्या किंमतीने जनता हैराण झाली आहे. मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा 72 रुपये लिटर पेट्रोल मिळत होते; परंतु तेच पेट्रोल आज 108 रुपये झाले आहे असे असताना पुन्हा घरगुती एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ केली आहे. आता घरगूती गॅस ला तब्बल 1000 रुपये पेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात.

जो पर्यंत सरकार महागाई कमी करत नाहीत तो पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेच तीव्र आंदोलन करत राहणार ,यावेळी पासलकर गॅस ऐजन्सी ते काॅर्पोरेशन चैकापर्यंत गॅस सिलेंडरची अत्यंयात्रा काढण्यात आली

याप्रसंगी प्रवक्ते प्रदीप देशमुख , उदय महाले, बाळासाहेब बोडके, निलेश निकम, महेश हांडे , गोविंद पवार, राजू साने, सुकेश पासलकर, अनिता पवार, शारदा ओरसे, अविनाश भांड, पुजा झोळे, अनिल पायगुडे, शैलेश साठे, असिफ शेख, शशिकांत जगताप, मधुकर पवार, दशरथ क्षेत्री, अमोल जाधव, दीपेश गराडे, निलेश रुपट्ट्के व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post