दैनिक हुपरी समाचार :
हुपरी : सगळीकडे दिवाळीची धामदुम , घरे सजलेली , सर्वत्र आनंदाला उधाण आलेला असताना हुपरीत पर राज्यातून गेली दोन वर्षे झोपडीत असणाऱ्या वृध्द दांपत्य आणि त्यांची नातवंडे या दिवाळीला पारखी होती , मात्र त्यांच्या झोपडीत अचानक येऊन हुपरी पोलीसानी आकाशकंदील दीप , व दिवे लावत त्याना , फराळ देऊन त्यांची अनोखी दिवाळी साजरी करीत सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी यानी पोलीसातील माणुसकीचे दर्शन घडवले.
या अनोख्या दिवाळी भेटीमुळे त्या वृद्ध दापन्त्याला अश्रू अनावर झाले ते या प्रकाराने गहिवरून गेले , मुख्य रस्त्याला लागुनच असलेल्या या झोपडीतील हा माणूसकिचा ओलावा हुपरी करांनी याची डोळी अनुभवला.सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज गिरी , दर्शन धुळे यांचे अनेकांनी यावेळी आभार मानले.
स पोनि पंकज गिरी यांना हुपरी येथील मिलींद हौसिंग सोसायटीजवळ गेली अनेक दिवस झोपडीत वास्तव्य करणाऱ्या वृध्द दपन्त्य आणि त्यांच्या लाहान नातवंडाच्या अंगावरील फाटकी कपडे आणि बाजारात सजलेल्या वस्तुकडे त्यांची असलेली मन हेलावून टाकणारी नजर यामूळे त्यांनी या कुटुंबाची दिवाळी आपण साजरी करण्याचा निर्णय़ घेतला पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल दर्शन धुळे,
पत्रकार व मा नगरसेवक अमजद नदाफ , पत्रकार संघाचे अध्यक्ष मुबारक शेख सर यांच्यासह पोलिस तेथे गेले त्यांनी त्यांच्या झोपडीला आकाशकंदील लावला फराळाचे साहित्य, लहान मुलाला खाऊ , फुलबाजे देऊन तुम्ही आमच्याच कुटुंबातील आहात असे सांगून दिवाळी साजरी करुन आनंदात सहभागी करुन घेतले , चक्क अचानक येऊन पोलीसानी आपली दिवाळी साजरी केल्यामुळे त्या वृध्द दांपत्याला अश्रू अनावर झाले , पोलीसतील माणुसकीचा ओलावा यावेळी प्रत्ययास आला.
फोटो
हुपरी पोलीसानी आज एका झोपडीत असणाऱ्या एका वृध्द दापन्त्याच्या झोपडीत जाऊन दिवाळी साजरी केली यावेळीस पो नी पंकज गिरी , दर्शन धुळे , अमजद नदाफ , मुबारक शेखसर आदी