विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना भाजपचे दोन नगरसेवक संपर्काच्या बाहेर .. ..

 भाजप मध्ये खळबळ ......


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

हुपरी : विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना हुपरी नगरपालिकेतील भाजपचे दोन नगरसेवक गेल्या चार दिवसांपासून संपर्कात नसल्याने खळबळ उडाली आहे. .

पालकमंत्री सतेज पाटील व माजी आमदार अमल महाडिक स्वतः व त्यांचे समर्थक नगरसेवकांच्या भेटीसाठी येत आहेत. गेले चार दिवस पालिकेतील महत्त्वाची पदे भूषविलेल्या दोन नगरसेवकांचे मोबाईल नॉट रिचेबल लागत आहेत. दरम्यान, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.


हुपरी पालिकेत भाजपची विधान परिषदेसाठी 9 मते आहेत. त्यातील दोन मतदार नॉट रिचेबल असल्यामुळे टोकन घेऊन सहलीला गेल्याची चर्चा आहे.

दरम्यान, भाजपच्या नेतृत्वाने हुपरी येथील भाजप नगरसेवकांची काल बैठक घेतली. त्या मध्ये तिघेजण हजर नव्हते असे समजते. त्या मुळे आता या मंडळींची शोध मोहीम होणार का, अशी चर्चा आहे. हुपरी पालिकेतील नॉट रिचेबल असलेल्या दोन नगरसेवकांशी संपर्क होत नसल्याची माहिती भाजपचे पक्षप्रतोद रफिक मुल्ला यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post