हुपरी परिसरात दोन दिवसांत चोरट्यांनी घातला धुमाकूळ .

 

चक्क हुपरी पोलीस ठाण्या समोरील मोबाईल शाॅपीच फोडण्याचे धाडस दाखवत उघड चॅलेंज दिले आहे.


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

हुपरी : परिसरात गेल्या दोन दिवसांत चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून आता तरी चक्क हुपरी पोलीस ठाण्या समोरील मोबाईल शाॅपीच फोडण्याचे धाडस दाखवत उघड चॅलेंज दिले आहे.पोलीसांचा धाक उरला नसल्याची चर्चा होत आहे.

येथील पोलीस ठाण्या समोरच सुहास बसवेश्वर चिखले यांचे मोरया मोबाईल शाॅपी हे मोबाईल व इतर ॲक्सेसेरीज विक्री व दुरूस्तीचे दुकान आहे. शुक्रवारी (ता.२६) रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कुलूप बंद असलेल्या दुकानाचे शटर कटावणी सारख्या हत्याराने उचकटून आत प्रवेश करून किंमती मोबाईल तसेच इतर ऐवज लंपास केला. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला.

घटनास्थळी हुपरी पोलीसांसह श्वान पथक तसेच ठसेतज्ञ दाखल झाले आहेत. पोलीसांनी चौकशी सुरू केली असून चोरीस गेलेल्या मालाची व रकमेची माहिती अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही आहे.

काल पट्टण कोडोली येथे एका बीअर बार, तसेच देशी मद्याच्या दुकानात तर रांगोळी मध्ये चोरीची घटना घडली होती. या घटना ताज्या असतानाच चोरट्यांनी अवघ्या काही अंतरावर पोलीस ठाण्या समोरच असलेल्या मोबाईल शाॅपी मध्ये धाडसी चोरी करण्याचा प्रकार घडला. यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धती बद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post