शिवसेना-युवासेना हुपरी शहर.
शिवसेना-युवासेना यांच्या वतीने महाविद्यालय प्रशासनाला धारेवर धरले.
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
हुपरी येथील पारिसाण्णा इंग्रोळे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून मनमानी पद्धतीने आकारण्यात येणारे अधिकचे शुल्क तत्काळ थांबविणे व याआधी आकारण्यात आलेले अधिकचे शुल्क विद्यार्थ्यांना तत्काळ परत करावे या मागणीसाठी शिवसेना-युवासेना यांच्यावतीने महाविद्यालय प्रशासनाला धारेवर धरण्यात आले व सदर प्रकरणी तत्काळ कार्यवाही करण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी विभागप्रमुख विनायक विभुते,शहरप्रमुख अमोल देशपांडे,युवासेना शहराधिकारी भरत देसाई,युवासेना उपतालुका अधिकारी संताजी देसाई,महिला आघाडी शहर संघटिका सौ.मीना जाधव,युवासैनिक अर्जुन मुरलीधर जाधव,गणेश कोळी,अरुण गायकवाड,अवघडी भानसे,नितीन काकडे, देवाशिष भोजे,विजय जाधव,नितीन काटकर,अभिजीत माणकापुरे,आकाश तवारकर,सौरभ खोत,ओंकार खांडेकर,उमाजी लाड,शुभम चौगुले,विनायक नाकील,निखिल शेटके,किरण कोळी यांच्यासह शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.