हातकणंगले लोकसभा मतदार संघातून भाजपचे संभाव्य उमदेवार म्हणून राहूल आवाडे यांच्या नावाची चर्चा आतापासूनच सुरु.

 


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

इचलकरंजी : जिल्हा परिषद सदस्य राहूल आवाडे हे आगामी लोकसभा निवडणूकीत उमेदवार असतील, अशी घोषणा आमदार प्रकाश आवाडे यांनी केली. येथे ताराराणी पक्ष कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थीतीत ही घोषणा करण्यात आली.त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदार संघातून भाजपचे संभाव्य उमदेवार म्हणून राहूल आवाडे यांच्या नावाची चर्चा आतापासूनच सुरु झाली आहे.

विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवार भेटीगाठी घेत आहेत. आज भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी ताराराणी पक्ष कार्यालयात आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह त्यांच्या समर्थक नगरसेवकांची भेट घेतली. यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी विधान परिषद निवडणूकीच्या निमित्ताने आपली भूमिका मांडली.

विधानपरिषद निवडणूकीच्या शर्यतीत राहुल आवाडे यांचे नाव देखील होते. मात्र सर्वानुमते अमल महाडिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल आवाडे हे उमेदवार असतील, असे आमदार आवाडे यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत घोषणाबाजी केली. तर चंद्रकांतदादा पाटील यांनीही त्याला स्मीतहास्य करीत दाद दिली.

आगामी लोकसभा निवडणूकीत हातकणंगले मतदार संघातून राहूल आवाडे हे भाजपचे संभाव्य उमदेवार.

या अनपेक्षीत घडामोडीने लोकसभा निवडणूकीचे पडघम आतापासूनच सुरु झाल्याचे चित्र आहे. आवाडे यांच्या घोषणेनंतर आवाडे समर्थकांनी राहूल आवाडे हे लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याचे पोष्ट जोरदार व्हायरल केली. यामुळे आगामी लोकसभा निवडणूकीत हातकणंगले मतदार संघातून राहूल आवाडे हे भाजपचे संभाव्य उमदेवार म्हणून आतापासूनच चर्चा सुरु झाली आहे. मुळात आवाडे - माने हा मोठा राजकीय संघर्ष झाला आहे. या घडामोडीमुळे पून्हा एकदा नव्याने या संघर्षाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. एकूणच विधान परिषदेचा प्रचार सुरु असतांना लोकसभा निवडणूकीचे पडघम आतापासूनच सुरु झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post