कागल येथे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने राधाकृष्ण (ओसवाल )एफ. एम. T 5, पंचताराकित एम आय डी सी यांना निवेदन देण्यात आले

 संबंधित कर्मचाऱ्याला कामावर रूजू करून घ्यावे अन्यथा आपल्या कार्याच्या दारामध्ये मनसे स्टाईल खळ खट्याक आंदोलन करण्यात येईल.


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

आज फाईव्ह स्टार एमआयडीसी कागल येथे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने राधाकृष्ण ओसवाल एफ. एम. T 5, पंचताराकित एम आय डी सी यांना निवेदन     देण्यात आले ,निवेदनात म्हटले आहे की आपल्या कंपनीतील पर्मनंट कामगार श्री संदीप राजाराम जाधव हे गेली १३ वर्षे प्रामाणिक पणे काम करत आहेत. आपली कंपनी सन २०१६ ते सन २०१७ पर्यंत आर्थिक नुकसानी मुळे बंद होती. त्यामुळे सुमारे ७० ते ८० कामगारांना कामअभावी बाहेर पडावे लागले आहे. आपल्या कुटुंबाची जबाबदारी असल्याने त्यांनी इतरत्र छोटे-मोठे व्यवसाय व काम करून आपली गुजराण चालली आहे.त्यातील काही कामगारांना आपण कामावर पूर्ववत रुजू करून घेतले काही कामगार अजूनही कामावर घेतले नाही. आपली कंपनी पूर्ववत तिन्ही शिप्ट मध्ये गेली ३ वर्षे चालू असताना ही व आर्थिक संकटातून बाहेर आले असताना सर्व कामगारांना परत बोलून त्यांना कामावर रुजू करून घेणे अपेक्षित आहे. तसे आपण न करता काही नवीन कामगारांना संधी दिली आहे जुन्या कामगारांना प्राधान्य देऊन त्या लोकांची एन ओ सी घेऊन तुम्ही नवीन भरती करणं अपेक्षित होतं असे न केल्या मुळे आपल्याच कंपनीतील जुन्या कामगारांच्या वर आपण अन्याय केला आहे . त्यातीलच एक कामगार हा श्री संदीप राजाराम जाधव यास कामावर रुजू करून घेतले नाही अनेक वेळा आपल्या कंपनीशी त्यांनी फेऱ्या मारून विनंती करूनही आपण त्याला अध्याप कामावर रुजू करून घेतले नाही. व साधी दखलही घेतली गेली नाही. त्या मुळे  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपणास विनंती करतो की सदर व्यक्तीस आपण तात्काळ कामावर रुजू करून घ्यावे. त्यांनी आपल्या कंपनीच्या हमीपत्रावर पर्सनल लोन घेतले आहे. त्याच्या कुटुंबाची पूर्ण जबाबदारी ही त्याच्यावर आहे व तो या नोकरीवर अवलंबून असल्याने त्याच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांना या कामाची गरज आहे व कंपनीच्या नियमाप्रमाणे त्यांना कामावर रुजू करून घेणे बंधन कारक आहे. तरी संबंधित कर्मचाऱ्याला कामावर रूजू करून घ्यावे अन्यथा आपल्या कार्याच्या दारामध्ये मनसे स्टाईल खळ खट्याक आंदोलन करण्यात येईल असा इशारा.राहुल विष्णु हजारे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य (कोल्हापूर जिल्हा) निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर संदीप राजाराम जाधव,प्रसाद देसाई, विकास पुजारी ( रेंदाळ),प्रशांत पाटील,सचिन सुतार,संदीप जाधव,पदम चौगले इतर कार्यकर्ते

Post a Comment

Previous Post Next Post