: देवकर पाणंद येथील मनोरमा नगर जवळील कचऱ्या मध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला.


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 कोल्हापूर : देवकर पाणंद येथील मनोरमा नगर जवळील कचऱ्यामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला. महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्याने पहिल्यांदा मृतदेह पाहिला.त्याने नागरिकांना बोलावले. नागरिकांनी पोलिसांना संपर्क करून घटनेची माहिती दिली.

हा मृतदेह महिलेचा असून तिचे वय २५ते ४० दरम्यान आहे. आठ ते दहा दिवसांपूर्वी मृतदेह टाकला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. घटना कळताच शहर पोलिस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव व जुना राजवाडा पोलीस कर्मचारी घटनास्थळी आले. मृतदेह कचर्‍यातून बाहेर काढून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यू कशामुळे झाला याचे कारण स्पष्ट होईल. असे पोलिस उपाधीक्षक चव्हाण यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post