हनीट्रॅप : टोळीचा मोरक्या सागर माने याच्या सहा जणांच्या टोळीने नियोजनबद्द कट करुन मैत्रीचा बहाणा करुन आणखी एका व्यापाऱ्याला लुटल्याची तक्रार.

तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जात असल्याने तक्रारदारांनी भयमुक्तपणे तक्रारीसाठी पुढे येण्याची गरज आहे


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

कोल्हापूर : 'हनीट्रॅप' गुंडाच्या टोळीचा मोरक्या सागर माने याच्या सहा जणांच्या टोळीने नियोजनबद्द कट करुन मैत्रीचा बहाणा करुन आणखी एका व्यापाऱ्याला लुटल्याची तक्रार शनिवारी रात्री उशीरा लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली.या व्यापाऱ्याला संगणमताने कट रचून ऑक्टोबर २०१९ ते मे २०२१ पर्यंत वेळोवेळी सुमारे अडीच लाख रुपयेला गंडा घातला आहे. या प्रकरणी टोळीचा म्होरक्या सागर पांडूरंग माने (वय ३२, रा. कात्यायणी कॉम्प्लेक्स, कळंबा) याच्यासह विजय यशवंत मोरे (३६, रा. व्हन्नूर, ता. कागल), सिया मोरे, तिचा भाऊ म्हणून सांगणारा अनोळखी तरुण, फारुख बाबासाहेब शेख (३२, रा. महाराणा प्रताप चौक), विजय उर्फ पिंटू शंकर कुलकुटगी (३९ रा. दौलतनगर, राजारामपूरी) या सहाजणांवर गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सिया मोरे नावाच्या महिलेने एका बड्या व्यापाऱ्याचा मोबाईल नंबर उपलब्ध करुन त्याच्याशी प्रथम व्हॉटसॲपवर मेसेज चॅटींग करुन भुरळ घातली. त्यानंतर तिने त्याला भेटण्यासाठी बाहेर बोलवले. दोघांनी एका हॉटेलमध्ये चहा घेतला, त्यावेळी महिलेने विश्वास बसेल असेच वर्तन केले. पुन्हा भेटण्यासाठी बोलवून तीने त्यांना शारिरिक लगड करण्याचा अग्रह केला. पण व्यापार्याने तिला दाद न देता सोबत गप्पा मारुन दुचाकीवरुन शहरात फिरत होते. त्यावेळी सागर मानेसह त्याच्या टोळीतील पाचजणांनी त्यांना रस्त्यात आडवले. दमदाटी, शिवीगाळ करुन मारहाण केली. दुसर्या एका लाल रंगाच्या मोटारीत जबरदस्तीने घालून दुसर्या ठिकाणी नेऊन बेदम मारहाण केली. पोलिसात बलात्काराची केस नोंदवण्याची धमकी देऊन प्रकरण मिटवण्यासाठी रोख रकमेचा तगादा लावला. त्यानंतर टोळीतील सदस्यांनी व्यापार्याकडून दोनवेळा ५० हजार रुपये , एकादा ६० हजार तर एकदा ९० हजार रुपये घेतले. पैशाची पिळवणूक झाल्याने व्यापार्याने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. हे सर्व गुन्हेगार हे जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीप्रकरणी कारागृहात आहेत. लवकरच त्यांच्याकडून ताबा घेतला जाईल असे पो. नि. अनिल गुजर यांनी सांगितले.

सहावा 'हनीट्रॅप' उघड, आणखी शक्यता

आठवडाभरात पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमोद जाधव यांच्या सुचनेनुसार 'हनीट्रॅप' करणार्या गुंडांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरु आहे. आतापर्यत जुना राजवाडा, शाहुपूरी, शिरोली एमआयडीसी, कागल, गोकुळ शिरगाव व आता लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक अशा एकूण सहा तक्रारी दाखल झाल्या. यापैकी तीन 'हनीट्रॅप' हे माने टोळीकडून घडले आहेत. गुंडांच्या टोळ्याकडून जिल्ह्यात मोठ्या संख्येने व्यापार्यांना लुबाडण्याचे 'हनीट्रॅप' झाल्याने ते हळूहळू उघड होऊ लागल आहेत. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जात असल्याने तक्रारदारांनी भयमुक्तपणे तक्रारीसाठी पुढे येण्याची गरज आहे

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार