ऑनलाईन रोजगार शोधताय तर रहा सावधान...

 मोठा पगार सह कमिशन देतो अशी अमिषे दाखवून गंडा घालणाऱ्या भामट्यांच्या जाळ्यात तुम्ही अडकू शकता.


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

कोल्हापूर : ऑनलाईन रोजगार शोधताय तर रहा सावधान... अशी म्हणण्याची वेळ आहे.मोठा पगार सह कमिशन देतो अशी अमिषे दाखवून गंडा घालणाऱ्या भामट्यांच्या जाळ्यात तुम्ही अडकू शकता.

कोरोना संकटानंतर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक सुशिक्षतांच्या हातचे काम गेले. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरातील बेरोजगार आपापल्या गावी परतले. मात्र सध्या परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. उद्योग व्यवसाय सुरू झाले आहेत. तसे सुशिक्षित बेजोरगार पुन्हा नोकरीचा शोध घेऊ लागलेत. ते रोजगार व्यवसाया संबधी इंटरनेटवरील विविध साईटवर शोध घेऊ लागले आहेत. याच संधीचा फायदा उठविण्यासाठी भामटेही सक्रीय झाले आहेत.

ऑनलाईनअ रोजगार, व्यवसाया संबधी खोटी माहिती अपलोड करून त्याआधारे सावज शोधू लागले आहेत. जिल्ह्याल काही बेरोजगारांनी ऑनलाईन रोजगार मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केला. मात्र त्यांच्याकडे डिपॉझीट म्हणून मोठी रक्कम मागण्यात आली. त्यांना याची शंका आली. त्यांनी याबाबत सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी त्यांना वेळीच गंडा घालणाऱ्या यंत्रणेपासून सावध केले. पण प्रत्येक वेळी असे होईलच असे नाही. त्यामुळे आता ऑनलाईन नोकरी, कमीशनवर कामाचा शोध घेणाऱ्यांनी दक्ष राहण्याची गरज बनली आहे.

होणारी फसवणूक -

 • मोठ्या पगाराच्या नोकरी अगर कमिशनची अमिषे दाखवणे

 • केवायसीची मागणी करून त्याचा दुरोपयोग करणे

 • करारासाठी मोठ्या रक्कमेची मागणी करणे

 • डेटा भरून देण्यासारख्या कामासाठी मोठ्या डिपॉझीटची मागणी

 • नोंदणीसाठी मोठे शुल्क भरण्याची सक्ती

 • करार मोडल्याची भिती दाखवून नोटीस पाठविणे

 • नोटीसीद्वारे दंड रूपात मोठी रक्कम उखळणे

यासंबधी रहा दक्ष...

 • रोजगार उपलब्ध करणाऱ्याची खरी माहिती जाणून घ्या

 • कायदे समजून करार करा

 • ॲडव्हान्स, डिपॉझिटच्या रक्कम खात्री करूनच भरा

 • शंका वाटल्यास पोलिसांशी साधा संपर्क

Post a Comment

Previous Post Next Post