भाऊ बहिणीच्या गोड नात्याला उजाळा देणारा दिवाळीतला सण म्हणजे भाऊबीज.


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

भाऊबीज  हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी असतो. हा महाराष्ट्रीय पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो. या सणास हिंदीत भाईदूज म्हणतात.हा बहीण-भावाचं नातेसंबंध धागा दृढ करणारा हा दिवस. भाऊ बहिणीच्या गोड नात्याला उजाळा देणारा दिवाळीतला  सण म्हणजे भाऊबीज. आज शनिवारी ( 6 नोव्हेंबर) भाऊबीज साजरी केली जाणार आहे. यंदा भावाला औक्षण करण्याचा शुभ मुहूर्त  काय आहे हे जाणून घेऊयात...


भाऊबीज साजरी करण्याची वेळ आणि मुहूर्त :-


भाऊबीज शनिवार 6 नोव्हेंबर या दिवशी आहे. हिंदू पंचांगानुसार यावर्षीच्या भाऊबीजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 8: 04 ते 11: 46 आणि सायंकाळी 6.02 ते 9.12 असा शुभ मुहूर्त आहे.

भाऊबीज हा सण बहीण भावांच्या पवित्र नात्याला ऋणानुबंध करणारा सण आहे. प्रत्येक बहीण भावांच्या दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्व असतो. भाऊबीज या दिवशी बहीण भावांच्या दीर्घ आयुष्यासाठी व त्याला सुख, शांती आणि समृद्धीची भरभराट लाभो यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करत असते तर भाऊ बहीणी घ्या सौभाग्य आणि तीच्या आयुष्यात भरपूर सुख, समाधान, समृद्धी, आणि ऐश्वर्य लाभो यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली जाते.


काय आहे कथा...

पौराणिक कथेनुसार असे सांगण्यात येते की, भगवान सूर्यदेव आणि त्याची पत्नी संज्ञा यांना दोन मुले होती, मुलाचे नाव यम व मुलीचे नाव यमुना असे होते. या दोन्ही भावा-बहिणींचे एकमेकांवर खूप प्रेम होते. पुढे यमुनेचे लग्न झाल्यावर यमुना आपल्या भावाला आपल्या घरी जेवावयास बोलावत असे, पण यमराज व्यस्त असल्याने यमुनाचा अग्रह टाळत होता. कारण त्याला दैनंदिन कामातून वेळ मिळत नसे. पण एक दिवस बहिणीच्या खूप आग्रहानंतर यमराज यमुनेला भेटण्यासाठी बलिप्रतिपदेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच कार्तिक शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी तिच्या घरी गेला. यमुनेने आपला भाऊ यमराज यांचे मनापासून स्वागत करून सायंकाळी यमराजा यांच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावून त्यांच्यासाठी सुंदर चविष्ट भोजन बनवून त्यांचा पाहुणचार केला. बहिणी यमुनेचे प्रेम, आपुलकी आणि आदराने केलेला पाहुणचार पाहुन यमराज प्रसन्न व आनंदी झाले. यमदेवाने बहीण यमुनेला काहीतरी मागण्यास सांगितले. तेव्हा यमुनेने तिला दरवर्षी याच कार्तिक प्रतिपदेच्या दुसऱ्या दिवशी घरी येण्याचे वरदान मागितले. बहीण यमुनेची ही विनंती भाऊ यमराज यांनी मान्य करून तिला काही हिऱ्यामोत्याची आणि सोन्याचांदीचे दागिने भेट म्हणून दिले. भाऊबीजेच्या दिवशी बहिणीने टिळा लावलेल्या भावाला उत्तम आरोग्य लाभते अशी समज आहे. हा दिवस भावांच्या उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. भाऊबीज या दिवसाला यम द्वितीया असेही अनेक ठिकाणी म्हणतात. म्हणून बहीण भावांचे नाते अतूट प्रेमस्नेहाने ऋणानुबंध व्हावे हा त्यांच्या मागचा उद्देश असतो.

Post a Comment

Previous Post Next Post