अंमली पदार्थ बाळगून प्रवास करणाऱ्या टांझानिया देशातील तरुणास पोलिसांनी केले जेरबंद .

सुमारे 11 लाख रुपये किंमतीचे 109 ग्रॅम कोकेन हस्तगत करण्यात आले.दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

पुणे-बेंगळूर मार्गावर सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर नजीक वाघवाडी फाटा येथे अंमली पदार्थ बाळगून प्रवास करणाऱ्या टांझानिया देशातील तरुणास पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून सुमारे 11 लाख रुपये किंमतीचे 109 ग्रॅम कोकेन हस्तगत करण्यात आले आहे.या परिसरात अशा प्रकारची अंमली पदार्थाची ही मोठी कारवाईने झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

माकेटो जॉन झाकिया (25, रा. जमोरिया मंगानो, टांझानिया) असे संशयिताचे नाव आहे. झाकिया हा खाजगी ट्रॅव्हल्स बस क्र. के.ए.-51-ए.एफ.6291 मधून अंमली पदार्थ जवळ बाळगून प्रवास करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी वाघवाडी फाटा (ता. वाळवा, जि. सांगली) येथे सापळा लावला. मध्यरात्री बस वाघवाडी फाटा येथे आल्यावर बसची झडती घेतली असता झाकिया हा आसन क्र. एल-13 वर बसला होता. त्याच्या बॅगची झाडती घेतली असता त्यामध्ये 109 ग्रॅम कोकेन हा अमली पदार्थ मिळून आला. त्याच्याकडून अंमली पदार्थ व एक मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे हवालदार दीपक ठोंबरे यांनी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात वर्दी दिली. झाकिया विरुध्द अंमली पदार्थ द्रव्य व मनप्रभावी पदार्थ अधि.1985 चे कलम 16, 21 नुसार गुन्हा नोंद केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रविण साळुंखे तपासा करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post