दहा हजार कर्मचारी सेवेत रुजू झाले

सांगली जिह्यातील सर्व दहा आगारांसह राज्यातील 24 आगारांतील वाहतूक हळूहळू सुरू झाली 


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 एसटी महामंडळाच्या कर्मचाऱयांना परिवहनमंत्र्यांनी 41 टक्के वेतनवाढ बुधवारी जाहीर केल्यानंतर  गुरुवारी सुमारे दहा हजार कर्मचारी सेवेत रुजू झाले आहेत. तसेच सांगली जिह्यातील सर्व दहा आगारांसह राज्यातील 24 आगारांतील वाहतूक हळूहळू सुरू झाली आहे.रात्री 8 वाजताच्या आकडेवारीनुसार विविध मार्गांवर 457 बसेसद्वारे 11,188 प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

एसटी महामंडळातील कर्मचाऱयांना वेतनवाढ तसेच इतर अनेक सोयी व सुविधा जाहीर केल्यानंतर परिवहनमंत्री व महामंडळाचे अध्यक्ष ऍड. अनिल परब यांनी कर्मचाऱयांना सकाळी आठपर्यंत कामावर हजर होण्याचे आवाहन केले होते. कर्मचारी कर्तव्यावर हजर झाल्यास त्यांचे निलंबन मागे घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे हळूहळू कामगार कामावर परतू लागले असून गुरुवारी 9,705 कर्मचारी कामावर हजर झाले. यात एसटीच्या प्रशासकीय विभागाचे 6,482, कार्यशाळेतील 2,585,चालक 398, वाहक 240 अशा कर्मचाऱयांचा समावेश आहे. एसटीच्या सांगली जिह्यातील सर्व दहा आगारांतून एसटीची अंशतः वाहतूक सुरू झाली असून रायगड विभागातील पेण आगारातून वाहतूक सुरू झाली.

ही आगारे प्रवाशांसाठी सुरू झाली

सांगली विभागातील सांगली, मिरज, इस्लामपूर, विटा, कवटेमहांकाळ, जत, शिराळा, पलूस, आटपाडी, तासगाव आगार, रायगड विभागातील पेण आणि महाड आगार, पालघर विभागाचे वसई आणि ठाणे आगार, कोल्हापूर विभागाचे चंदगड आगार, मुंबईचे परळ आगार, ठाण्याचे कल्याण आगार, पुण्याचे स्वारगेट व शिवाजीनगर आगार, सातारा, नाशिक आगार, रत्नागिरीचे देवरुख व राजापूर आगार, भंडाऱयाचे साखोली आगार प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू झाले आहे.

परिवहनमंत्र्यांचा इशारा, कामावर या, नाहीतर कठोर कारवाई

एसटीची आर्थिक स्थिती काईट असतानाही राज्य सरकारने कर्मचाऱयांच्या पगारकाढीचा निर्णय घेतला. खरे तर मागण्या मान्य झाल्याकर लढाई थांबकायची असते. आता कर्मचाऱयांना कामाकर यायचे आहे. आम्ही उद्या सकाळपर्यंत काट पाहू. त्यानंतर कठोर निर्णय घेऊ, जे संपात राहतील त्यांच्याकर कठोर कारकाई केली जाईल. तुटेपर्यंत ताणू नये. त्यानंतर जोडता येणार नाही, असा इशारा परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱयांना दिला आहे.

खोत, पडळकर बाहेर

एसटी कर्मचाऱयांचे आंदोलन आपण मागे घेत असल्याची घोषणा आमदार सदाभाऊ खोत यांनी आज केली. तसेच गोपीचंद पडळकर आणि मी या आंदोलनातून बाहेर पडत असल्याचेही खोत म्हणाले. विलीनीकरणाचा निर्णय येईपर्यंत संप तसाच सुरू ठेवणे शक्य नाही, असे पडळकर म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post