लक्ष्मी पूजनासाठी सायंकाळी 4 तास शुभ .. जाणून घ्या सविस्तर माहीत...

 दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

दिवाळी  गुरुवारी (ता. ४) नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन असून बुधवार (ता.३) वगळता दिवाळी पाडवा, भाऊबीज सण पाठोपाठ येत आहेत.नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा यादिवशी मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. लक्ष्मी पूजनासाठी सायंकाळी 4 तास शुभ आहेत..जाणून घ्या सविस्तर माहीत...

लक्ष्मीपूजनासाठी सायंकाळचे 'हे' 4 तास शुभ

लक्ष्मी पूजनाला बत्तासे, लाह्यांचा नेवैद्य दाखवण्यात येतो. पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांनी मेनरोड, रविवार कारंजा याठिकाणी गर्दी केली होती. लक्ष्मी पूजनाला बत्तासे, लाह्यांचा नेवैद्य दाखविण्यात येत असल्याने मोठी मागणी आहे. वसूबारसपासून ते भाऊबीजपर्यंत दीपोत्सव साजरा केला जातो. नरक चतुर्दशीच्या पहाटेपासून फटाके उडवायला सुरवात होते. व्यापाऱ्यांचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. लक्ष्मीपूजनासाठी सायंकाळी ५ : १० ते ९ या वेळेत शुभ, अमृत, चंचल असे तीनही योग येत असल्याने योग शुभ आहेत.

- लक्ष्मीपूजन मुहूर्त (योग)

सकाळी ११ : १० ते १२ : ४० (चंचल)

दुपारी १२ : ४० ते ३ : ४० (लाभ, अमृत)

सायंकाळी ५ : १० ते ९ : ०० (शुभ, अमृत, चंचल)

- दीपावली पाडवा मुहूर्त (योग)

सकाळी ६ : ४० ते ९ : ४० ( लाभ, अमृत)

दुपारी ९ : ४० ते ११ : १० (अमृत)

सायंकाळी ५ : १० ते ६ : ४० (चंचल)

नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी येत आहे. नरक चतुर्दशीला सूर्योदयाच्या आत अभ्यंगस्थान करावे. लक्ष्मीपूजनासाठी सायंकाळी ५ : १० ते ९ या वेळेत शुभ, अमृत, चंचल असे तीनही योग येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post