दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
मुंबई- केंद्र सरकार दिवसेंदिवस दरवाढ करुन महागाईचा नवा उच्चांक गाठत आहे.एकीकडे पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरुच असताना आता व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात २६६ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
या दरवाढीमुळे देशातील हॉटेल व्यवसाय आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरवर आधारीत असलेल्या उद्योगांवर संकट ओढवले आहे.कोरोना आणि लॉकडाऊननंतर आता कुठे हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योग स्थिरस्थावर होत असताना सिलिंडरच्या महागाईमुळे व्यावसायिकांचे कंबरडे मोडण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे,अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत फेसबुक पेज च्या माध्यमातून करण्यात आली आहे.
दरम्यान, व्यावसायिक सिलिंडरसोबतच घरगुती गॅसच्या दरातही याआधी भरमसाठ वाढ झाली आहे. मोदी सरकारने घरगुती गॅस ४०० रुपयांवरुन ९०० रुपयांवर आणून सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केलेय. "ना खाऊंगा, ना खाने दुंगा" म्हणत सत्तेत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आता अक्षरशः लोकांच्या खाण्याचे वांदे करत आहेत,असा ही टोला राष्ट्रवादी काँग्रेसने लगावला आहे