मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये मोठी कारवाई


 २ कोटी ३५ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त केले.


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये मोठी कारवाई करत २ कोटी ३५ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त केले. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात असणाऱ्या एमडीचा (मेफेड्रोन) कारखान उद्ध्वस्त केला.माहितीनुसार कोल्हापुरमधील हा कारखाना मुंबईतील एका वकीलाकडून हा ड्रग्ज बनवण्याचा कारखान चालवला जात होता. दरम्यान, या मुख्य आरोपी असणाऱ्या वकील राजकुमार राजहंस याला अटक केली आहे.

राजकुमार राजहंस हा फरार होता. मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याला मालाड परिसरातून अटक केली आहे. याआधी मुंबईत एका महिलेला आणि चंदगडमधील ढोलगरवाडी गावात असणाऱ्या फार्महाऊसच्या केअरटेकरला अटक करण्यात आली आहे. ख्रिस्थीना उर्फ आयेशा आणि निखिल लोहार यांच्या अटकेनंतर ड्रग्स फॅक्टरीचा मास्टरमाईड असणाऱ्या वकील राजकुमार राजहंस यालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

मुंबई पोलिसांनी कोल्हापुरातील ड्रग्ज कारखाना केला उद्ध्वस्त

मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कोल्हापुरात मोठी कारवाई केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात असणाऱ्या एमडीचा (मेफेड्रोन) कारखान उद्ध्वस्त केला. डीसीपी दत्ता नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने एका महिलेला अटक केली आहे. तिला ५० ग्रॅम एमडी सहित अटक केली होती. हे ड्रग्ज कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड गावातील ढोलगरवाडी गावातून आल्याचे स्पष्ट झाले होते. वांद्रे युनिट आणि घाटकोपर युनिटच्या तीन टीम तिकडे पाठवण्यात आल्या होत्या आणि तिकडे एका फार्महाऊसवर सर्च ऑपरेशन करण्यात आले. ३८ किलो ७०० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आणि इतर साहित्य हस्तगत करण्यात आले. तसेच रॉ मटेरियलसुद्धा जप्त करण्यात आले. एकूण २ कोटी ३५ लाख रुपयांचे हे ड्रग्ज आहे जे ढोलगरवाडी गावातल्या फार्महाऊसवरून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post