11 नोव्हेंबरपासून पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्वच शाळा सुरू होणार का ..?दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 दिवाळीच्या सुट्टीनंतर आता राज्यात प्रत्यक्ष शाळा कधी सुरू होणार यावरून मुख्याध्यापक शिक्षक आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे शिक्षण संचालनालयाने 12 नोव्हेंबरला होणाऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी 11 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत .  

माञ याविषयी स्थानिक पातळीवर कोणतीही स्पष्टता नसल्याने नेमकी शाळा कधीपासून सुरू होणार कोणत्या इयत्तांच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावणार याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे मुंबईतील अनेक शाळांनी पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून पाल्याला शाळेत पाठविण्यासाठी संमतीपत्र भरून घेण्याची तयारीदेखील सुरू केली आहे त्यामुळे 11 नोव्हेंबरपासून पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्वच शाळा सुरू होणार का असा प्रश्न पालक विचारत आहेत .

दिवाळीच्या सुट्टीसाठी शालेय शिक्षण सहसचिव आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दोन स्वतंत्र आदेश जारी केल्याने मुंबईसारख्या शहरातील शाळांसमोर सुट्टी सुरू होण्यापूर्वी अडचणी निर्माण झाल्या होत्या.शिक्षण सहसचिवांनी 28 नोव्हेंबरपासून तर उपासंचालकांनी 1 नोव्हेंबरपासून सुट्टी जाहीर केली होती. या सुट्टीनंतर 11 नोव्हेंबर रोजी शाळा सुरू होणार आहे. मात्र दुसऱयाच दिवशी म्हणजे 12 नोव्हेंबरला काही निवडक शाळांमध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (एनएएस) होणार असून त्यासाठी सर्वच शाळांतील विद्यार्थी, शिक्षकांना शाळेत का बोलाविण्यात येत आहे, असा सवाल शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे.

एनएएस सर्वेक्षण निवडक शाळांमध्ये होणार असल्याने सर्वच शाळांमधील विद्यार्थी, शिक्षकांना शाळेत येण्याची सक्ती करू नये, अशी मागणी शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली आहे. तसेच या सर्वेक्षणाच्या आयोजनाबाबत शाळांना कोणत्याही सूचना मिळालेल्या नसल्याचेही दराडे म्हणाले.

एनएएस सर्वेक्षणासाठी शाळा सुरू राहतील

शालेय शिक्षण विभागाने दिवाळीच्या सुट्टय़ा या 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत जाहीर केल्या आहेत. त्यामुळे शाळा या 11 नाव्हेंबर रोजी सुरू होतील. शिवाय 12 नोव्हेंबर रोजी असलेल्या राष्ट्रीय संपादणूक (एनएएस) सर्वेक्षणामुळे शाळा सुरू ठेवाव्या लागणार आहेत. मात्र स्थानिक स्तरावर यापुढे काही दिवस दिवाळीची सुट्टी शाळांना घेता येईल, मात्र त्यासाठी स्थानिक शिक्षण विभाग अधिकाऱयांशी शाळांना संपर्प साधावा लागेल, असे शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले.


मुंबईत सातवी पर्यंतच्या शाळा सुरू होणार नाहीत

मुंबई महापालिका क्षेत्रात सध्या तरी पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्याचा कोणताही विचार नाही. पालिका आयुक्त तसेच पालिका आरोग्य विभागाकडून अद्यापही यासंदर्भात कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. शाळा पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून पाल्याला शाळेत पाठविण्याविषयी संमतीपत्र लिहून घेत असतील तर ते चुकीचे आहे. पालिका शिक्षण विभागाने याविषयी कोणत्याही सूचना सध्या तरी जारी केलेल्या नाहीत.

राजू तडवी शिक्षणाधिकारी, मुंबई महापालिका.

 तर दिवाळी सुट्टीवरून गोंधळ झाला नसता

शालेय शिक्षण विभागात कोणताही समन्वय नसल्याने त्यांचे दिवाळी सुट्टय़ांचे नियोजन बिघडलेले आहे. त्यात शाळा सुरू करण्याचे आदेश हे 11 नोव्हेंबर रोजी असले तरी दुसऱया दिवशी होणाऱया राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात शाळांना हेच काम करावे लागणार आहे, त्यामुळे शाळा सुरू राहिल्या तरी विद्यार्थ्यांना शिकवता येणार नाही. यामुळे सर्वेक्षण मध्येच न आणता 20 नोव्हेंबरनंतर घेतले असते तर शाळा कधी सुरू होणार यावरून गोंधळ निर्माण झाला नसता.

सुधीर घागस अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना

Post a Comment

Previous Post Next Post