मायभूमीतील सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी स.पो.नि.सुभाष पुजारी

 


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

रेंदाळ  : (प्रतिनिधी)

ज्या मातीत मी खेळलो, लहानाचा मोठा झालो, व्यायामाचे धडे घेतलो त्या ठिकाणी आज माझा सत्कार संपन्न झाला हे माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. हा सुवर्णक्षण माझ्या आयुष्यात नेहमीच जपून ठेवेन असे भावनिक उद्गार रेंदाळचे सुपुत्र, आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव खेळाडू, पनवेलचे स.पो.नि. सुभाष पुजारी यांनी काढले.आर.के. ग्रुप व्यायाम मंडळ मानेनगर यांचे वतीने सुभाष पुजारी यांचा भव्य नागरी सत्कार करणेत आला त्यावेळी ते बोलत होते.

सुभाष पुजारी हे पनवेल येथे स.पो.नि. या पदावर कार्यरत आहेत. शरीरसौष्ठव या क्रिडा प्रकारात उझबेकिस्तान येथील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करताना अंतिम फेरीत ब्रांझपदक मिळविले. देश विदेशातील अनेक स्पर्धांमध्ये नेत्रदीपक कामगिरी करुन वस्त्रनगरी रेंदाळ व रजतनगरी हुपरीचे नाव उज्ज्वल केले आहे त्याबद्दल आर.के. ग्रुप मानेनगर व हुपरी पंचक्रोशीतील व्यायाम शाळा, तालिम मंडळे, सर्वपक्षीय मान्यवर यांचे वतीने भव्य नागरी सत्काराचे आयोजन केले होते.

सुभाष पुजारी यांचे गावभाग हुपरी येथील छ.शिवाजी चौक येथे स्वागत करणेत आले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि नागरीकांच्या उपस्थितीत सुभाष पुजारी यांनी छ.शिवाजी महाराज यांच्या मुर्तीस अभिवादन केले. दुपारी ४ वा. आर.के.ग्रुप व्यायामशाळा पटांगण येथे समस्त मान्यवर व नागरीक, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत भव्यदिव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सुभाष पुजारी यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी हुपरीच्या नगराध्यक्षा सौ.जयश्री गाट, स.पो.नि.आडसुळे साहेब, नगरसेवक रफिक मुल्ला, सुभाष कागले,रेंदाळचे ग्रा.पं.सदस्य महेश कोरवी, रेंदाळचे माजी प्रभारी सरपंच श्री अभिषेक पाटील, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष एम.बी. माळी, राजेंद्र साळुंखे, सचिन पिसाळ, सुनिल करडे,शामराव पाटील पोलीस काॅस्टेबल कपिल हाळदे,  संदिपराव कदम, राजेंद्र मुदाळकर, पोपटराव पाटील, प्रविण वाशिकर, शिवराज नाईक,  सतिश पिसाळ, आबासाहेब जगताप, अमित गिरी,सागर घाडगे, भागातील व पंचक्रोशीतील नागरीक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे संस्थापक रावसाहेब कुंभार यांचे मार्गदर्शन व मंडळाचे अध्यक्ष सुनिल कुंभार यांचे अतुलनीय योगदान लाभले.

या कार्यक्रमाचे नियोजन आर.के. ग्रुप व्यायाम मंडळ मानेनगर रेंदाळ व आर.के. ग्रुप बिरदेवनगर शाखा २ रेंदाळ यांनी केले. संयोजन संजय ढोणुक्षे, सुहास उलपे, महेश उलपे, देवेंद्र कुंभार, केतन सादळे, सुरज पवार, शितल गुरव, उमेश उलपे,  रोहित पाटील, हितेश उलपे, वैभव बारगे, रोहित कुंभार, अतुल होगाडे, शुभम उलपे, सचिन कुंभार, स्वप्निल कुरळे, सोमनाथ मगदूम, अविनाश सप्तसागरे यांनी केले.प्रस्तावना संजय ढोणक्षे यांनी केली. सुत्रसंचालन अमित कांबळे यांनी केले व आभार प्रदर्शन राहूल कुंभार यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post