महाविकास आघाडीने भाजपचा दारुण पराभव केला.दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

सांगली - सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे निकाल समोर आले असून यामध्ये महाविकास आघाडीने भाजपचा दारुण पराभव केला. एकूण 18 जागांसाठी 46 उमेदवार मैदानात होते. तर लढत महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात होती.यात महाविकास आघाडीने वर्चस्व मिळवले.

तत्पूर्वी निवडणुकीच्या आधीच महाविकास आघाडीने तीन जागा बिनविरोध जिंकल्या होत्या. त्यानंतर 18 जागांसाठी ही निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत एकूण 85 टक्के मतदान झालं होतं. या निवडणुकीत निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते कृषिराज्यमंत्री विश्वजीत कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती.

दरम्यान काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांना धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजपचे प्रकाश जमदाडे यांनी आमदार विक्रम सावंत यांचा पराभव केला आहे. प्रकाश जमदाडे यांना 45 मते मिळाली तर आमदार विक्रम सावंत यांना 40 मते मिळाली.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक निकाल विजयी उमेदवार.....

१) विशाल पाटील, काँग्रेस (मिरज सोसायटी गट)
२) आ.मोहनराव कदम, काँग्रेस (कडेगाव सोसायटी गट)
३) महेंद्र लाड काँग्रेस, पलूस (सोसायटी गट) (बिनविरोध)
४) जयश्री मदन पाटील, काँग्रेस (महिला गट)
५) अनिता सगरे, राष्ट्रवादी (महिला गट)
६) दिलीप पाटील राष्ट्रवादी (वाळवा सोसायटी गट)
७) आ.मानसिंगराव नाईक, राष्ट्रवादी (शिराळा सोसायटी गट) (बिनविरोध)
८) बी एस पाटील, राष्ट्रवादी (तासगाव सोसायटी गट)
९) प्रकाश जमदाडे, भाजपा (जत सोसायटी गट)
१०) तानाजी पाटील, शिवसेना (आटपाडी सोसायटी गट)
११)आ.अनिलभाऊ बाबर, शिवसेना (खानापूर सोसायटी गट) (बिनविरोध)
१२)अजितराव घोरपडे, शिवसेना (कवठेमहांकाळ सोसायटी गट)
१३)वैभव शिंदे, राष्ट्रवादी (पाणीसंस्था गट)
१४)मन्सूर खतीब, राष्ट्रवादी (ओबीसी गट)
१५) बाळासाहेब होनमोरे, राष्ट्रवादी (अनुसुचित जाती जमाती गट)
१६)राजेंद्र उर्फ चिमण डांगे राष्ट्रवादी (भटक्या जमाती)
१७)सुरेश पाटील, राष्ट्रवादी (प्रक्रिया गट)
१८)पृथ्वीराज पाटील, (काँग्रेस पतसंस्था)
१९)राहुल महाडिक, भाजपा (पतसंस्था)
२०)संग्रामसिह देशमुख, भाजपा (औद्योगिक प्रक्रिया गट)
२१)सत्यजित देशमुख, भाजपा (औद्योगिक प्रक्रिया गट)

Post a Comment

Previous Post Next Post