Posts

Showing posts from December, 2021

सातारा एसपींच्या कथित स्विय्य सहाय्यकाची पिडितांना धमकी.

Image
एसपींचा 'पीए' म्हणून बोलणाऱ्या त्या महिलेवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :   सातारा-  खटाव तालुक्‍यातील एका गावातील मुलाने त्याच गावातील मुलीचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मुलीच्या घरातील लोकांनी आक्रमक पवित्रा घेत, मुलाच्या घरातून मुलीची सुटका करून घेतली. मात्र, या प्रकरणात अचानक सातारा एसपींच्या कथित स्विय्य सहाय्यकाची (पीए) एंट्री झाल्याने वेगळाच ट्विस्ट निर्माण झाला आहे. सातारा एसपींची पीए असल्याचे सांगून एका महिलेने संबंधित गावच्या सरपंचालाच फोन करून प्रकरण आजच्या आज मिटवा असा दम दिल्याने एसपींचा 'पीए' म्हणून बोलणाऱ्या त्या महिलेवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,खटाव तालुक्‍यातील एका गावातील मुलगी साताऱ्यातून काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाल्याने सातारा शहर पोलीस ठाण्यात मिसींगची तक्रार दाखल होती. त्यानंतर सदर मुलीला तिच्याच गावातील एका मुलाने पळवून नेल्याचे समोर आल्यानंतर दोन्हीकडच्या लोकांच्यात बाचाबाचीला सुरूवात झाली. परिणामी मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या घरात कोंडून ठेवलेल्या मुलीची सुटका

शुक्रवारी सरत्या वर्षाला निरोप, तर नववर्षाचे स्वागत होणार

Image
जिल्ह्यातील हॉटेल खवय्यांसाठी रात्री बारापर्यंत सुरु राहणार दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :   कोल्हापूर : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात नियम आणि निर्बंधांचे पालन करत आज, शुक्रवारी सरत्या वर्षाला निरोप, तर नववर्षाचे स्वागत होणार आहे. शहर आणि जिल्ह्यातील हॉटेल खवय्यांसाठी रात्री बारापर्यंत सुरु राहणार आहेत. त्यादृष्टीने हॉटेल व्यावसायिकांनी तयारी केली आहे. जिल्ह्यातील जमावबंदी आणि ओमायक्रॉनबाबतच्या निर्बंधामुळे नववर्षाच्या स्वागतावर मर्यादा आल्या आहेत. शासनाच्या नियमांचे पालन करत कोल्हापूरकरांनी थर्टी फर्स्टच्या पार्टीचे नियोजन केले आहे. आपल्या बजेट आणि सोयीस्कर ठरणाऱ्या हॉटेलमध्ये टेबलची नोंदणी अनेकांनी केली आहे. आपल्या अथवा मित्र-मैत्रिणी, नातेवाइकांच्या घरी काहींनी मर्यादित सदस्यांच्या उपस्थितीमध्ये पार्टीची तयारी केली आहे. हॉटेल व्यावसायिकांनी ५० टक्के क्षमतेने बैठक व्यवस्था, एक आड एक टेबलची रचना केली आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार पार्सल सुविधा पुरविण्याची तयारी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे. हॉटेलमध्ये आकर्षक विद्युत रोषणा

तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करून फरार झालेला

Image
हुपरी  येथील भामट्याला करवीर पोलिसांनी मुंबईत अटक केली.   निखिल चंद्रकांत घोरपडे (वय 26) असे त्याचे नाव आहे.   दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : कोल्हापूर :   मुंबई पोलिस दलात भरतीच्या आमिषाने पाचगाव व पिरवाडी (ता. करवीर) येथील तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करून पसार झालेल्या हुपरी (ता. हातकणंगले) येथील भामट्याला करवीर पोलिसांनी मुंबईत अटक केली. निखिल चंद्रकांत घोरपडे (वय 26) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली. पत्रकार असल्याचा बहाणा करून संशयिताने पाचगाव, पोवार कॉलनीतील मनोहर पाटील यांचा मुलगा ओंकारला मुंबईत रेल्वे पोलिस दलात भरती करतो, असे सांगून 4 लाख 76 हजार रुपयांना फसविले तसेच पिरवाडी (ता. करवीर) येथील शेखर बाजीराव शेळके यांना मुंबईत पोलिस उपनिरीक्षक पदावरील नियुक्तीचे बनावट आदेशपत्र देऊन 5 लाख 89 हजार 200 रुपये उकळले आहेत. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. घोरपडेला फसवणुकीच्या गुन्ह्यात मुंबई पोलिसांनी अटक करून त्याची रवानगी ठाणे येथील कारागृहात केली होती. करवीर पोलिसांनी त्यास कारागृहातून ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली फसवणुकीचे अनेक प्रकार झाल्याचा स

थर्टी फर्स्ट सेफ्टी फर्स्ट..

Image
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड टास्क फोर्सची तातडीची बैठक घेतली दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : नवीन वर्षाचे स्वागत करताना थर्टी फर्स्टच्या जल्लोषावर नियंत्रण आणावे लागणार आहे. कारण मुंबईसह राज्यात कोरोना आणि ओमायक्रोन अतिशय वेगाने पसरतो आहे. राज्यात आज दिवसभरात पाच हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभमीवर राज्य सरकारने सावधगिरीच्या उपायोजना सुरू केल्या आहेत. सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय आणि लग्न सोहळ्यांत फक्त 50 जणांना उपस्थित राहता येईल. अंत्यसंस्काराला 20पेक्षा अधिक लोकांचा समावेश नसावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर कोरोना संसर्गाची स्थिती पाहून सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी कठोर निर्बंध लावण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड टास्क फोर्सची तातडीची बैठक घेतली आणि त्यात निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला. मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना आणि ओमायक्रोन व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत वाढताना दिसत आहे. एक दिवसाआड रुग्णसंख्या दुप्पट होत असल्याने सर्वांचीच चि

वक्फ बोर्डच्या सुमारे ४०९ एकर क्षेत्र खालसा करुन खासगी लोकांच्या घशात घातल्याचा धक्कादायक प्रकार २९ डिसेंबर रोजी उजेडात

Image
१५ जणांवर शिवाजीनगर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नाेंद करण्यात आला.  दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :    बीड: आष्टी तालुक्यातील चिंचपूर व रुईनालकोल येथील देवस्थान व वक्फ बोर्डच्या जमिनीच्या गैरव्यवहाराचे प्रकरण गाजत असतानाच आता वक्फ बोर्डच्या सुमारे ४०९ एकर क्षेत्र खालसा करुन खासगी लोकांच्या घशात घातल्याचा धक्कादायक प्रकार २९ डिसेंबर रोजी उजेडात आला. याप्रकरणी १५ जणांवर शिवाजीनगर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नाेंद करण्यात आला. तत्कालीन उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह महसूलच्या ८ अधिकारी- कर्मचाऱ्यांचा आरोपींत समावेश आहे. जिल्हा वक्फ अधिकारी अमीनजुमा खलीखुजमा यांच्या तक्रारीनुसार, वक्फ बोर्डची जिल्ह्यात ७९६ एकर जमीन आहे, त्यापैकी ४०९ एकर ५ गुंठे जमीन बनावट कागदपत्रे तयार करुन खासगी लोकांच्या नावे करण्यात आली. दर्गा हजरत शहशाहवली दर्गाची दहा एकर जमीन राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ लगत सर्व्हे क्र.२२ व ९५ मध्ये आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणात या जमिनीचा सुमारे १५ कोटी रुपये मावेजा आला होता. तो हडप करण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरुन खासगी लोकांच्या नावे करण्यात आली. यासाठी लाचखोरी व मनी लाॅड्रिंग

आमदार नितेश राणे यांचा अटपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला

Image
  दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांना झालेल्या मारहाण प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, हा अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार अद्याप कायम आहे. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मात्र, आज नेमकं न्यायालयात सुनावणी दरम्यान काय झालं? नितेश राणेंना कोणतं कारण सांगून अटकपूर्ण जामीन अर्ज नाकारण्यात आला, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे. काय आहे प्रकरण? गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून आलं. नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात देखील या प्रकरणाचे पडसाद दिसून आले. शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते संतोष परब यांनी आपल्याला मारहाण झाल्याची तक्रार दाखल केली आहे. तसेच, आपल्याला मारहाण करणाऱ्या व्यक्तीने नितेश राणेंचं नाव घेतल्याचं देखील त्यांनी तक्रारीत नमूद केलं आहे. त्यामुळे संतोष

कोणाला तरी सांभाळण्यासाठी, कोणाला तरी मान देण्यासाठी बिनविरोध निवडणूक टाळली...

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :   कोल्हापूर :  जिल्हा बँक चांगली चालली आहे यात दुमत नाही. गोकुळ पण चांगलच चाललं होतं. त्या संस्थेत निवडणूक का लावली. गोकुळ  मध्ये निवडणूक पाहिजे आणि बँकेत नको असे का ?  असाही सवाल मान्यवरांनी आज केला. तर, कोणाला तरी सांभाळण्यासाठी, कोणाला तरी मान देण्यासाठी बिनविरोध निवडणूक टाळली असल्याचा आरोप बँकेचे विद्यमान संचालक बाबासाहेब पाटील- आसुरलेकर  यांनी केला. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी    निवडणूकीच्या   पार्श्वभूमीवर आज कळंबा येथे शिवसेना प्रणित राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचा मेळावा झाला. करवीर, गगनबावडा, पन्हाळा आणि कोल्हापूर शहरातील ठरावदार मतदारांचा मेळावा सुरू आहे. यावेळी ते बोलत होते.गोकुळ संचालक अजित नरके म्हणाले, जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी बँकेच्या मतदारांनी भरभरून साथ दिली आहे. सर्वांचाच पाठिंबा मिळत आहे. शेकापचे केरबा पाटील म्हणाले, ज्यांनी बँक अडचणीत आणली तेच सांगताहेत, जिल्हा बँक चांगली चालली आहे. बँक चांगली चालली आहेत यात दुमत नाही. गोकुळ पण चांगल च चाललं होतं. त्या संस्थेत निवडणूक का लावली. असाही सवाल केला. गोकुळ मध्ये निवडणूक

धुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणावर बोगस लसीकरण प्रमाणपत्र वितरित

Image
'मालेगाव कनेक्शन'ही समोर आल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे.  दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :   धुळे  : कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत धुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणावर बोगस लसीकरण प्रमाणपत्र वितरित केले गेले  अर्थात लस न देता संबंधितांना केवळ प्रमाणपत्रे दिली गेली. यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे. हा विषय सुरवातीला महापालिका प्रशासनाने हलका घेतला. मात्र, आता या प्रकरणात 'मालेगाव कनेक्शन'ही समोर आल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. या विषयावर आता अधिकारी मात्र चौकशी सुरू आहे, या पलीकडे काहीही बोलायला तयार नाहीत. त्यामुळे घोटाळ्याचा संशय बळावत चालला आहे.  कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र, राज्य शासनाने शासकीय यंत्रणेला रात्रंदिवस कामाला लावले आहे. त्यात आता राज्यात ओमिक्रॉनचा  शिरकाव झाल्यानंतर नागरिकांच्या लसीकरणाचा तगादा लागला आहे. त्यातच धुळ्यात महापालिकेच्या  माध्यमातून नागरिकांना बोगस लसीकरण प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली, असा आरोप झाला आहे. सुरवातीला महापालिकेच्या स्थायी समिती सभेत सत्ताधारी भाजपचे सदस्य सुनील बैसाणे

तब्बल 18 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सांगली बाजार समितीच्या परिसरात घुसलेला गवा पकडण्यात वन विभागाला यश

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : सांगली : एका  गवा साठी    तब्बल 18 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सांगली बाजार समितीच्या परिसरात घुसलेला गवा पकडण्यात वन विभागाला यश आले. कोणतीही इजा न करता हा गवा बंदिस्त करण्यात आला. त्यामुळे मार्केट यार्ड परिसरातील व्यापाऱयांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान, या गव्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. सांगली शहराच्या नागरी वस्तीत असणाऱया मार्केट यार्ड परिसरात मंगळवारी पहाटे गवा आढळून आला. गव्याला पकडण्यासाठी या परिसरात जमावबंदी आदेश लागू करून वन विभाग, महसूल आणि पोलिसांनी सर्व यंत्रणा कामाला लावली. तब्बल 18 तासांच्या अथक प्रयत्नानंतर रात्री दीड वाजेच्या सुमारास मार्केट यार्ड परिसरातील एका अरुंद बोळात गवा आला असताना गल्लीच्या एका बाजूला रेस्क्यू व्हॅन लावण्यात आली, तर या गल्लीचा दुसरा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला. गवा गाडीत जाईल, यादृष्टीने योग्य खबरदारी घेण्यात आली. काही वेळाने हा गवा अलगद गाडीत गेला. कोणतीही इजा अथवा मारहाण न करता अत्यंत सुरक्षितपणे गव्याला पकडण्यात यश आले. गवा पकडल्याचे समजताच मार्केट यार्ड परिसरातील व्यापाऱयांनी सुटकेचा

26 डिसेंबरपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली

Image
सार्वजनिक ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसाठीही काही नियम लागू करण्यात आले आहेत दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :   औरंगाबादः  मुंबई सह राज्यभरात मागील दोन दिवसात कोरोनाचा विस्फोट पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र खबरदारीचे उपाय लागू करण्यात आले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातही ओमिक्रॉन रुग्ण आढळून आल्याने तसेच इतर जिल्ह्यांतील स्थिती पाहता, जिल्हा प्रशासनाने नियमावली जारी केली आहे. शहरात 26 डिसेंबरपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसाठीही काही नियम लागू करण्यात आले आहेत. शहरासाठीचे नियम कोणते? – रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. या काळात पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे रात्रीनंतर मोठ्या संख्येने एकत्र येऊन थर्टी फर्स्ट पार्टीचा प्लॅन करत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. – हॉटेल आणि सर्व प्रकारची दुकाने पूर्ण वेळ सुरु राहतील. मात्र त्यांना आसन क्षमतेच्या 50 टक्केच परवानगी देण्यात आली आहेत. – बंदिस्त जागेतील लग्न समारंभात, कार्यकर्

मला कोणी काय दिले असेल तर ते कागलच्या जनतेने आणि ज्येष्ठनेते शरद पवार यांनी झोळी भरून दिले ...

Image
  दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : कोल्हापूर : महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात पंधरा वर्षापासून मंत्री म्हणून काम करत आहे. आत महाविकास आघाडीत दोन वर्षापासून आहे. त्यामुळे मला कोणी काय दिले असेल तर ते कागलच्या जनतेने आणि ज्येष्ठनेते शरद पवार  यांनी झोळी भरून दिले आहे, असा पलटवार ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी खासदार संजय मंडलिक यांच्यावर केला. जिल्हा बॅंकेच्या करवीर, गगनबावडा आणि शहरातील ठरावधारकांचा मेळावा महासैनिक दरबार हॉल येथे झाला यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी.एन.पाटील, आमदार प्रकाश आवाडे, आमदार विनय कोरे, आमदार जयंतराव आसगावकर आदी उपस्थित होते. श्री मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नेहमी कौत्तुक करत आलो आहे. 2014 ला विधानसभा निवडणूक झाली. कॉंग्रेस-राष्ट्रवादीची अपेक्षीत आमदार विजयी झाले नाहीत. त्यामुळे भाजप-शिवसेना युती होणार हे स्पष्ट होते. पण गृहमंत्री अमित शहा यांनी उध्दव ठाकरे यांना अडीच वर्ष मुख्यमंत्री करण्याचा दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे युती तुटल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सहकार्याने

हेमंत सोरेन सरकारने राज्यात पेट्रोलच्या दरात 25 रुपये प्रति लिटर कपात जाहीर केलीय

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : रांची :  गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलचे भाव गगनाला भिडत असल्याचं चित्र यला मिळतंय. पेट्रोल आणि डिझेलनं शंभरी ओलांडलेली असून, दोन्ही इंधनाचे दर नवनवे रेकॉर्ड प्रस्थापित करत आहेत. विशेष म्हणजे देशातील वाढत्या पेट्रोलच्या किमतीच्या पार्श्वभूमीवर झारखंडच्या हेमंत सोरेन सरकारने नववर्षानिमित्त राज्यातील जनतेला मोठी भेट दिलीय. हेमंत सरकारने राज्यात पेट्रोलच्या दरात 25 रुपये प्रति लिटर कपात जाहीर केलीय. हेमंत सोरेन सरकारने ही सवलत फक्त दुचाकींसाठी दिलीय. खरं तर बुधवारी झारखंड सरकारला 2 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने झारखंडच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट करण्यात आले होते. आता राज्यातील दुचाकी वाहनांना 25 रुपयांची सूट देण्यात आलीय, अशी माहिती त्या ट्विटमध्ये देण्यात आली होती. 26 जानेवारीपासून स्वस्त पेट्रोल मिळणार खरे तर झारखंड सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त बुधवारी राज्य सरकारने रांचीमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सीएम हेमंत सोरेन यांनी पेट्रोलच्या किमतींबाबत महत्त्वाची माहिती दिली. गरीब व्यक्तीच्य

राधानगरी धरणाचा दरवाजा तांत्रिक काम सुरु असताना अडकला.

Image
  राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला , नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला   दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : कोल्हापूर मधील राधानगरी धरणाचा तांत्रिक काम सुरु असताना अडकला. त्या मुळे राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे.या शिवाय नदीपात्रात हे पाणी सोडले जात असल्यामुळे, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी तीन ते चार फुट वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.राधानगरी धरणाचा दरवाजा अडकल्याने पाण्याचा विसर्ग वाढला आहे.त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला असून, दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे.त्यामुळे नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज २९ डिसेंबरला सकाळी साडे आठच्या सुमारास राधानगरी धरणातील सर्व्हिस गेटचे काम सुरु होते. हे तांत्रिक काम सुरु असताना धरणाचा एक दरवाजा खाली घेण्याचे काम सुरु होते. यादरम्यान, राधानगरी धरणाचा दरवाजा अडकल्याने धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढला. या मोठ्या प्रमाणातील विसर्गामुळे

इचलकरंजीत राष्ट्रीय काँग्रेसचा 136 वा वर्धापन दिन साजरा

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : इचलकरंजी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्वपूर्ण योगदान देणा-या अखिल भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचा 136 वा वर्धापन दिन इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी कार्यालयात कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष नगरसेवक संजय कांबळे यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला.यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सचिव ,नगरसेवक शशांक बावचकर यांची प्रमुख उपस्थिती होती. इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी कार्यालयात अखिल भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचा 136 वा वर्धापन दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळीकॉंग्रेसचे शहर अध्यक्ष नगरसेवक संजय कांबळे यांच्या हस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेस पक्षाच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.यावेळी शहर अध्यक्ष संजय कांबळे यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील कॉग्रेस पक्षाचे योगदान व स्वातंत्र्योत्तर काळातील देशाची प्रगती याचा आढावा घेऊन कॉग्रेस पक्ष अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव  शशांक बावचकर व नगरसेवक राहुल खंजीरे यांनी देखील आपल्या मनोगतात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची परंपरा व या पक्षाने द

जिल्हा परिषदेच्या पार्किंगची व्यवस्था कोलमडली

Image
  छोटे-मोठे अपघात आणि वादावादीचे प्रसंग दररोज घडत आहेत दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : कोल्हापूर :  नागाळा पार्कातील जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पार्किंगचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या दारातूनच आरटिओ ऑफिस विवेकानंद कॉलेज तसेच अन्य कार्यालयांकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर नेहमीच गर्दी असते. यातच जिल्हा परिषदेच्या पार्किंगची व्यवस्था कोलमडली असल्याने सर्व वाहने ही रस्त्याच्या दुतर्फा लागत आहेत. त्यामुळे छोटे-मोठे अपघात आणि वादावादीचे प्रसंग दररोज घडत आहेत. मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात सहाशेपेक्षा अधिक कर्मचारी आहेत. जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य आणि त्यांच्यासोबत येणारे कार्यकर्ते, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींचे लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने नियमितपणे जिल्हा परिषदेत येतात. दररोज हजारोंच्या संख्येने लोक जिल्हा परिषदेला भेट देऊन कामांचा निपटारा करण्याचा प्रयत्न करतात. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या आवारात केवळ अधिकारी, पदाधिकारी यांचीच वाहने पार्किंगची व्यवस्था आहे, तर कागलकर हाऊसच्या बाजूला उर्वरित वाहने पार्कि

पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेवर 31 डिसेंबर पासून राज्य शासनाने प्रशासक नियुक्ती

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :   पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेवर 31 डिसेंबर पासून राज्य शासनाने प्रशासक नियुक्ती केली असून, प्रशासकपदी मुख्याधिकारी स्वरूप खरगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र आज पन्हाळा पालिकेला प्राप्त झाले. कोरोनामुळे नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून, त्यामुळे पालिका पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्यानंतर प्रशासक म्हणून पालिकेचा कार्यभार मुख्याधिकारी स्वरूप खरगे हे पहाणार आहेत, पन्हाळा नगरपालिकेत गेली पाच वर्षे जनसुराज्य शक्ती पक्षाची निर्विवाद सत्ता होती. पालिका निवडणूकीसाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू असताना निवडणूक आयोगाने हि निवडणूक पुढे ढकलल्याने इच्छुकांच्यात नाराजी पसरली आहे.

विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांच्या कार्यपद्धतीवर भाजपची जोरदार टीका

Image
विरोधी पक्षनेतेे प्रविण दरेकर  सभापती विरोधात अविश्वास आणणार  दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :   मुंबई  | राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन प्रचंड वादळी होत आहे. विविध मुद्दयांवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधक भाजपमध्ये जोरादार जुंपली आहे. अशातच आता विधानपरिषद उपसभापती पदावरून वाद रंगला आहे विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांच्या कार्यपद्धतीवर भाजपनं जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्षनेतेे प्रविण दरेकर यांनी सभापती विरोधात अविश्वास आणणार असल्याचं म्हटलं आहे. निलम गोऱ्हे या शिवसेनेच्या आघाडीच्या महिला नेत्या आहेत. आपल्या आक्रमक आणि अभ्यासपुर्ण भाषणांनी त्यांनी अनेकदा विरोधकांना नामोहरण करून सोडलं आहे. पण त्या सध्या वादात अडकल्या आहेत. निलम गोऱ्हे यांनी विश्वासार्हता गमावली आहे. परिणामी त्यांना या पदावर राहण्याचा कसलाही अधिकार नाही, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडं गोऱ्हे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव आम्ही दाखल केला असल्याची माहिती दरेकर यांनी दिली आहे. दरेकर यांनी संविधान

गव्याला पकडण्यात अडचणी येऊ नये म्हणून शहरात १४४ कलम लागू

Image
वन विभाग, स्थानिक पोलीस आणि प्राणीमित्र गव्याला पकडण्याचे प्रयत्न करत आहेत दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : सांगलीच्या सीमेवर फिरत असलेला गवा मध्यरात्री शहरात दाखल झाला. सांगली शहरातील प्रमुख मार्गावरून गवा रेड्याने मार्गक्रम करीत सकाळच्या सुमारास बाजार समिती गाठली. वन विभाग, स्थानिक पोलीस आणि प्राणीमित्र गव्याला पकडण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र गवा मुख्य शहरात दाखल झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गर्दी होऊ नये आणि गव्याला पकडण्यात अडचणी येऊ नये म्हणून शहरात १४४ कलम लागू केले आहे. गवा घुसल्याने आज बाजार समिती बंद ठेवली आहे. या एका दिवसात १० कोटींची उलाढाल ठप्प होण्याची शक्यता आहे. दरम्यान गव्याला पकडण्यासाठी वनविभाग, महसूल प्रशासन, बाजार समिती प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू आहेत. सध्या गव्याला एका ठिकाणी थांबवण्यात आलंय. मात्र, त्याला पकडण्यात यश आलेलं नाही. हा गवा गेल्या चार दिवसांपासून या परिसरात फिरतोय. पुणे आणि कोल्हापूरवरून तज्ज्ञांचं पथक या गव्याला पकडण्यासाठी बोलावण्यात आलंय, अशी माहिती विभागीय वनअधिकारी अजित साजने यांनी दिली. शहरात कलम १४४ लावल्यामुळे

महाबळेश्वरच्या डोंगर रांगांत अनेक सुंदर पॉइंट्स दुर्लक्षित

Image
वन विभागाच्या वतीने त्यांचा विकास करण्यात येईल. दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :   महाबळेश्वरच्या डोंगर रांगांत अनेक सुंदर पॉइंट्स दुर्लक्षित आहेत,अशा पॉइंट्सचा शोध घेऊन वन विभागाच्या वतीने त्यांचा विकास करण्यात येईल. यानंतर हे पॉइंट्स पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले जातील, अशी माहिती उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिली. थंड हवेचे ठिकाण म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर येथे निसर्गसौंदर्याचा प्रचंड खजिना आहे. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी महाबळेश्वर येथे एकापेक्षा एक सरस पॉइंट्स येथे आहेत; परंतु तेच तेच पॉइंट्स पाहून पर्यटक कंटाळले आहेत. अनेक वेळा नियमित येणारे पर्यटक पॉइंट्सला जातच नाहीत. त्याचप्रमाणे ऑर्थरसीट पॉइंट या मार्गावरच पर्यटकांची गर्दी होते. त्यामुळे त्या भागात वाहतुकीची कोंडी होते. पर्यटकांना वेगवेगळ्या भागांत पॉइंट्स उपलब्ध करून दिले तर एकाच भागात होणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीचे विकेंद्रीकरण होईल. त्यामुळे वन विभागाने महाबळेश्वरच्या जंगलात व डोंगरात लपलेल्या आणि दुर्लक्षित पॉइंट्सचा शोध सुरू केला आहे. यात अवकाळी येथे रॉजमन रॉक, तर मांघर येथे नॉर्थकोट असे दोन पॉ

मांजरा सारखा म्याव म्याव आवाज काढणारे आज मांजरा सारखे लपून बसलेत'.

Image
  दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : मुंबई - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्यानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांची कणकवली पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली आहे. सचिन सातपुतेच्या चौकशी नंतर शिवसेनेने नितेश राणे यांनाही अटक करण्याची मागणी आक्रमकपणे लावून धरली आहे. यावरून शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी नितेश राणे यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले,'जो व्यक्ती दुसऱ्यासोबत वाईट वागतो त्याला नेहमीच देव शिक्षा देतो. जे गुन्हेगार असतात ते सर्वात जास्त पोलिसांना घाबरतात. प्रत्येक गुन्हेगार कायदा आणि पोलिसांना घाबरत असतो. कोणी गुन्हा केला हे मला माहिती नाही. मात्र जे दुसऱ्यांना चिडवतात तशीच परिस्थती दैव त्यांच्यावर आणतं असतो. त्यामुळे आपलं वागणं चांगलं ठेवलं पाहिजे.' ते पुढे म्हणाले,'मांजरा सारखा म्याव म्याव आवाज काढणारे आज मांजरा सारखे लपून बसलेत'असं म्हणत त्यांनी राणेंवर टोला लगावला आहे.

ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी विधानसभेत ठराव मंजूर

Image
  ओबीसी आरक्षण वगळून निवडणुका घेऊ नयेत,   दोन्ही सभागृहांत एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला. दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : इम्पेरिकल डेटाच्या अभावी सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केलेल्या इतर मागास प्रवर्गाच्या अर्थात ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी आज विधानसभेत ठराव मंजूर करण्यात आला. राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षण वगळून निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी या ठरावाद्वारे करण्यात आली. दोन्ही सभागृहांत एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला. भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदेसह 15 पंचायत समित्या आणि 106 नगरपालिकांच्या निवडणुका 21 डिसेंबर रोजी ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडल्या. राज्य मंत्रिमंडळाने ठराव करूनही राज्य निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणूक घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसींच्या आरक्षित जागा खुल्या करून त्यावर येत्या 18 जानेवारीला निवडणूक होणार आहे. तसेच नजीकच्या काळात इम्पेरिकल डेटा उपलब्ध होण्याची शक्यता नसल्याने मुंबईसह अन्य महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पवारांच्या प्रस्तावाला फडणवीसांचा पाठिंबा विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसी आरक्षणाचा

महापूरप्रश्‍नी कृष्णा खोऱ्याचा समग्र अहवाल तयार करण्याचा निर्णय

Image
  दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : सांगली ः महापूर प्रश्‍नी स्वयंसेवी संघटना, जागरुक नागरीकांनी केलेल्या सूचनांचा समावेश करून कृष्णा खोऱ्याचा समग्र अहवाल तयार करण्याचा आणि मुख्यमंत्र्यासमवेत सर्व संबंधित शासन विभागांची बैठक घेण्याचा निर्णय शनिवारी (ता. २५) कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीच्या बैठकीत झाला. पर्यावरणवादी चळवळीतील ज्येष्ठ नेत्या मेधा पाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीसाठी सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. समितीच्या वतीने गेले सहा महिने तीनही जिल्ह्यांतील महापुरानंतरच्या स्थितीचा अभ्यास सुरू आहे. त्याबरोबर अनेक स्वंयसेवी संघटनाही या बाबत अभ्यास करीत आहेत. त्यांच्या समन्वय ठेवून किमान समान मुद्द्यांवर आधारित समग्र अहवाल तयार करावा. त्याआधारे शासनाला निर्णय घेण्यासाठी भाग पाडावे, या हेतूने सांगलीत बैठक झाली. या वेळी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील, महापूर कृती नागरी समितीचे प्रमुख विजयकुमार दिवाण, डॉ. रवींद्र व्होरा, वास्तूरचनाकार प्रमोद चौगुले, माजी नगरसेवक हणमंतराव पवार, सेवानिवत्त अभियंता संघटनेच

28 डिसेंबर रोजी पत्रकार संघाचे ठाणे येथे राज्यस्तरीय 16 वे अधिवेशन

Image
 महाराष्ट्रातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - वसंत मुंडे. दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : मुंबई :महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सोळावे राज्यस्तरीय अधिवेशन ठाणे येथील गडकरी रंगायतन सभाग्रहात मंगळवार दिनांक 28 डिसेंबर रोजी होणार आहे. या राज्यस्तरीय अधिवेशनाला महाराष्ट्रातील सर्वाधिक पत्रकारांनी आपला सहभाग उस्फूर्तपणे नोंदवावा असे आवाहन पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सोळावे राज्यस्तरीय अधिवेशन दरवर्षीप्रमाणे यावर्षी ठाणे येथील रंगायतन सभाग्रहात मंगळवार दिनांक 28 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे.या राज्यस्तरीय अधिवेशनाला नामवंत पत्रकार उपस्थित राहणार असून मान्यवरांची देखील उपस्थिती लाभणार आहे. या अधिवेशनामध्ये उपस्थित राहणाऱ्या पत्रकार संघाच्या सभासदांना पत्रकार संघाच्यावतीने देण्यात येणारे साहित्य अधिवेशन स्थळी देण्यात येणार आहे. या अधिवेशनाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सर्व राज्यस्तरीय प्रमुख पदाधिकारी, विभाग स्तरावरील प्रमुख पदाधिकारी, जिल्हा, शहर, तालुका स्तरावरील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि पत्रकार संघाच

राज्यभरातील भाविकांनी दर्शनासाठी जोतिबा डोंगर गाठला.परिणामी, डोंगर हाउसफुल्ल

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : जोतिबा डोंगर :  नाताळची सुटी तसेच कोरोनानंतर येणाऱ्या ओमिक्रॉनच्या धास्तीमुळे आज राज्यभरातील भाविकांनी दर्शनासाठी जोतिबा डोंगर गाठला. परिणामी, डोंगर हाउसफुल्ल झाल्याचे चित्र होते. दिवसभरात दीड लाख भाविक डोंगरावर आले. मिनी चैत्र यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. गर्दीमुळे दोन किलोमीटर अंतरापर्यंत दर्शन रांग लागली. लॉकडाउन झाल्यावर देवाचे दर्शन घेता येणार नाही या भीतीने आज भाविक सहपरिवार डोंगरावर दाखल झाले. गर्दी मुळे यंत्रणेवर मोठा ताण पडला. भाविकांचे प्रचंड हाल झाले. मंदिरात पहाटे घंटानादानंतर धार्मिक विधीस प्रारंभ झाला. पाद्यपूजा, काकड आरती मुखमार्जन झाले. त्यानंतर अभिषेक विधी झाला. श्रीची सरदारी महापूजा बांधण्यात आली होती. पहाटेपासूनच डोंगर गर्दीने फुलून गेला होता. रात्री पालखी सोहळा झाला. पालखीवर गुलाल खोबऱ्याची उधळण झाली. 'चांगभलं'च्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून गेला होता.दिवसभर उन्हाचा तडाखा होता. उन्हात उभे राहून सर्रास भाविकांनी दर्शनाचा आनंद लुटला. ठाकरे मिटके गल्लीतून एसटी बसस्थानकापर्यंत दर्शन रांग लागली. मंदिर परिसर, सेंट्रल प्लाझा, य

भाजी पाल्‍यांचे दर दीडशे-दोनशेच्‍या घरात

Image
सर्वसामान्‍यांच्‍या खिशाला महागाईचा तडका  दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : सातारा :  पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्‍या दराचे सीमोल्‍लंघन सुरू असतानाच भाजी पाल्‍यांच्‍या दराने रोज उच्‍चांक स्‍थापन करण्‍यास सुरुवात केली आहे. भाजीपाल्‍यांचे दर दीडशे-दोनशेच्‍या घरात जाऊन ठेपल्‍याने सर्वसामान्‍यांच्‍या खिशाला महागाईचा तडका बसत आहे. विविध कारणांमुळे वाढलेले भाजीपाल्‍याचे हे दर कमी होण्‍यास आणखी काही दिवस लागण्‍याची शक्‍यता असल्‍याचे मत शेतकरी व्‍यापारी आणि विक्रेते व्‍यक्‍त करत आहेत. गेल्‍या काही दिवसांत पेट्रोलचा दर ११० रुपये, तर डिझेलचा दर १०० च्‍या घरात ठाण मांडून बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले असतानाच घरगुती गॅस सिलिंडरने एक हजार रुपयांचा पल्‍ला गाठत सर्वसामान्‍यांचा खिसा मोकळा करण्‍यास सुरुवात केली. पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्‍या दरवाढीमुळे कोलमडलेले बजेट सावरण्‍याचा प्रयत्‍न सर्वसामान्‍यांकडून सुरू असतानाच भाजीपाल्‍याने दररोज दराचे उच्‍चांक करण्‍यास सुरुवात केली आहे. गत १५ दिवसांपासून मंडईत टोमॅटोचा दर १०० च्‍या घरात ठाण मांडून बसला आहे. टोमॅटोपाठोपाठ वांगी, पावटा, फ्‍लॉवर, कोबी, गवारी, भे

आयकर विभागाने नाशिकसह धुळे आणि नंदुरबार मध्ये विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. या छापेमारीत कोट्यवधी रुपयांचं घबाड आयटीच्या हाती लागलं

Image
तीन जिल्ह्यातून 240 कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त   दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : नाशिक :   गेल्या काही काळापासून महाराष्ट्रासह देशात भ्रष्टाचार आणि करचोरीची अनेक प्रकरणं समोर आली आहे. आयटी आणि ईडीने केलेल्या कारवाईत अनेक मोठे मासे गळाला लागले आहेत. उत्तर प्रदेशात एका अत्तर व्यावसायिकाकडे तब्बल 257 कोटींचं घबाड सापडल्याची घटना ताजी असताना, आता महाराष्ट्रात देखील आयकर विभागाने छापेमारी केली आहे. आयकर विभागाने नाशिकसह धुळे आणि नंदुरबारमध्ये विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. या छापेमारीत कोट्यवधी रुपयांचं घबाड आयटीच्या हाती लागलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाच्या छाप्यात संबंधित तीन जिल्ह्यातून 240 कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त  करण्यात आली आहे. यामध्ये 6 कोटींच्या रोकडसह 5 कोटींचे मौल्यवान दागिने देखील जप्त केले आहे. उत्तर महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसात आयकर विभागाने तब्बल 31 ठिकाणी छापेमारी केली आहे. या कारवाईत आयकर विभागाने 240 कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली आहे.  कोट्यवधींचा अत्तर व्यापारी पीयूष जैनला अटक, 257 कोटींपेक्षा जास्त रक्कम जप्त   जमीन खरेदी विक्री करणारे व्

टीईटी गैरव्यवहार : जी ए सॉफ्टवेअरचा व्यवस्थापक अश्विनकुमार याच्या बंगलुरुच्या घरातून

Image
पुणे पोलिसांनी तब्बल १ कोटी १ लाख ९५ हजार ८०५ रुपयांचे सोने, चांदी व हिरे अशी मालमत्ता जप्त केली दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : पुणे : टीईटी गैरव्यवहारात सहसंचालक तुकाराम सुपे याच्या घरातून व इतर नातेवाईकांकडून सव्वा तीन कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्यानंतर आता जी ए सॉफ्टवेअरचा व्यवस्थापक अश्विनकुमार याच्या बंगलुरुच्या घरातून पुणे पोलिसांनी तब्बल १ कोटी १ लाख ९५ हजार ८०५ रुपयांचे सोने, चांदी व हिरे अशी मालमत्ता जप्त केली आहे. पुणे पोलिसांनी बंगळुरु येथील अश्विनकुमार याच्या घरावर शुक्रवारी छापा घातला होता. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सोने, चांदी व हिऱ्याचे दागिने आढळून आले. या संपूर्ण मालमत्तेची मोजदाद व मुल्यांकन करण्याचे काम शनिवारी दिवसभर सुरु होती. डाॅ. प्रीतीश देशमुख याच्याअगोदर जी ए सॉफ्टवेअरचे महाराष्ट्रातील कामकाज आश्विनकुमार पाहत होता. त्याने २०१८ मध्ये राज्य परीक्षा परिषदेचा संचालक सुखदेव डेरे याच्याशी संगनमत साधून २०१८ च्या टीईटी गैरव्यवहार केला. त्यात त्यांनी तब्बल ५ कोटी रुपयांची कमाई केल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे. पुण्यात सुखदेव डेरेला २१

लातूर जिल्ह्यातील औसा येथे एक भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :  लातूर : लातूर जिल्ह्यातील औसा येथे एक भीषण अपघात झाला आहे.या अपघातात  तिघांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या लातूरच्या सरकारी दवाखान्यात उपचार सुरु आहे. मृतांमध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, एकानं उपचारासाठी नेलं जात असताना प्राण सोडला आहे. सदर अपघात प्रचंड भीषण होता. अनेकांना दरवाजा तोडून बाहेर काढावं लागलं आहे. रात्रीच्या वेळेस हा अपघात झाला. भरधाव काळीपिवळी आणि बोलेरो  जीप एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. हा दरम्यान, या अपघातात एकूण तिघांचा मृत्यू झाला असून, एकूण ७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर काळी-पिवळीला जोरदार धडक बसून ती रस्त्याच्या एका बाजूला पलटली या अपघातानंतर दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला होता. त्यानंतर प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळीपिवळीत अडकलेल्या प्रवाशांना गाडीचे दरवाजे तोडून बाहेर काढण्यात आलं आहे. सर्व प्रवाशी या गाडीत अडकले होते. लातूर-निलंगा रस्त्यावर दावतपूर पाटीजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर काळी-पिवळीला जोरदार धडक बसून ती रस्त्याच्या एका बाजूला पलटली होती. या धडकेत दोघा प्रवाश

महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने देण्यात येणाऱ्या २०२० मधील ग्रंथ पुरस्कारासाठी

Image
संतोष जगताप, डॉ.जगन्नाथ पाटील, डॉ.दीपक पवार, सुचिता घोरपडे, अंजली ढमाळ, संपत मोरे आदींच्या पुस्तकांची निवड करण्यात आली.  दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :   कोल्हापूर :  महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने देण्यात येणाऱ्या २०२० मधील ग्रंथ पुरस्कारासाठी संतोष जगताप, डॉ.जगन्नाथ पाटील, डॉ.दीपक पवार, सुचिता घोरपडे, अंजली ढमाळ, संपत मोरे आदींच्या पुस्तकांची निवड करण्यात आली. दोन जानेवारी,२०२२ रोजी पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. संतोष जगताप यांच्या 'विजेने चोरलेले दिवस' या कादंबरीस देवदत्त पाटील पुरस्कार, सुचिता घोरपडे यांच्या 'खुरपं' या कथासंग्राहास शंकर खंडू पाटील पुरस्कार, डॉ. जगन्नाथ पाटील यांच्या 'चंबुखडी ड्रीम्स' आत्मचरित्रास अण्णा भाऊ साठे पुरस्कार, डॉ. दीपक पवार यांच्या 'महाराष्ट्र -कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प' ( संकीर्ण) या पुस्तकास कृ. गो. सूर्यवंशी पुरस्कार अंजली ढमाळ यांच्या 'ज्याचा त्याचा चांदवा' या कवितासंग्रहास शैला सायनाकर पुरस्कार, संपत मोरे यांच्या 'मुलूखमाती' या व्यक्तीचित्रणास चैतन्य माने पुरस्कार (प्रथम प्रकाशन) पुरस्कार

जिल्‍हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी ..

Image
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : कोल्‍हापूर :  जिल्‍हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. शिवसेना विरुद्ध सर्व, असे चित्र स्‍पष्‍ट झाले आहे. त्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी खूपच आक्रमक असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र शिवसेनेतील फूटदेखील यानिमित्त स्‍पष्‍ट झाली आहे. शिवसेनेकडून मंत्री असलेले   राजेंद्र पाटील यड्रावकर    व खासदार धैर्यशील माने  यांच्या मातोश्री माजी खासदार   निवेदिता माने  या सत्तारूढ आघाडीकडून उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. असे असताना शिवसेनेने तयार केलेल्या प्रचाराच्या बॅनरवर मात्र मंत्री यड्रावकर व खासदार माने यांचे फोटो असल्याने मतदारांमध्ये वेगवेगळी चर्चा सुरू आहे.  जिल्‍हा बँके ची निवडणूक ऐनवेळी दुरंगी झाली आहे. मागील काही निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या छत्राखाली एकत्र काम करणारे काँग्रेस, राष्‍ट्रवादी, शिवसेना यांच्यात फाटाफूट झाली आहे. शिवसेना विरुद्ध सर्व अशी स्‍थिती आहे.  काँग्रेस, राष्‍ट्रवादी  सोबत भाजप आल्याने राज्यात एक नवीनच पॅटर्न पाहायला मिळत आहे. याचे पडसाद राज्याच्या राजकारणातही उमटण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसेना विरोधात असली तरी त्यांच

अभिनेता सलमान खानला सर्पदंश ,

Image
सध्या सलमानची प्रकृती चांगली असल्याची माहिती देण्यात आली आहे. दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा ;   ख्रिसमस आणि नववर्षांच्या सेलिब्रेशनसाठी पनवेल येथील फार्म हाऊसवर गेलेल्या अभिनेता सलमान खान सोबत मोठी घटना घडली. सलमान खान शनिवारी मध्यरात्री सर्पाने दंश केल्याची माहिती समोर आली. फार्म हाऊस मध्येच ही घटना घडली असून, त्यानंतर सलमान खानला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या सलमानची प्रकृती चांगली असल्याची माहिती देण्यात आली आहे. अभिनेता सलमान खान शनिवारी पनवेलमधील त्याच्या फार्म हाऊस होता. मध्यरात्री फार्म हाऊसमध्ये त्याला सापाने चावा घेतला. सलमान खानला दंश करणारा साप विषारी नसल्याने मोठी भीती दूर झाली. मात्र, त्यानंतर तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. सलमान खानला नवी मुंबईतील कामोठे परिसरात असलेल्या एमजीएम रुग्णालयात मध्यरात्री दाखल करण्यात आलं. सलमानवर डॉक्टरांनी तातडीने उपचार केले. त्यानंतर आता सलमान खानची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती देण्यात आली आहे.मध्यरात्री 3 वाजता सलमान खानला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार केल्यानंतर त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून, सक