50 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या हवालदाराला पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 बारामती   : ओढून आणलेली स्कॉर्पिओ सोडण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या हवालदाराला पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात ही कारवाई करण्यात आली.माणिक गदादे असे ताब्यात घेतलेल्या लाचखोर पोलिस हवालदाराची नाव आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयात कार्यरत असलेल्या गदादे याची काही दिवसांपूर्वीच बारामती येथे गार्ड म्हणून नेमणूक झाली होती.

गदादे यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून एक स्कॉर्पिओ ओढून आणली होती. या वाहनाचा दरोड्याच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे त्यांनी वाहनमालकाला सांगत वाहन सोडण्यासाठी 50 हजाराच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार दिली होती.

तक्रारीची खातरजमा केली असता गदादे यांनी तडजोडीअंती लाच मागितल्याचे समोर आले. त्यानुसार त्यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील प्रक्रिया सुरु आहे.

Post a Comment

Previous Post Next Post