मनसेच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलेदैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

भिवंडी - भिवंडी शहरातील अशोक नगर येथील मनसेच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, अभिजित पानसे, भिवंडी शहराध्यक्ष मनोज गुळवी, प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे, मनविसेनेचे संतोष साळवी, परेश चौधरी व अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

दरम्यान कार्यक्रमाच्या ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केल्याने प्रचंड गोंधळ उडाला होता. त्यातच कार्यालयाचे उदघाटन करून कार्यकर्त्यांशी संवाद न साधताच राज ठाकरे परतल्याने मनसे कार्यकर्त्यांचा हिरमोड झालेला दिसला.

दरम्यान भिवंडी पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका पुढील काही महिन्यात होणार असल्याने राज ठाकरे यांच्या भिवंडी आगमनाने कार्यकर्त्यांना संजीवनी मिळाली असून पुढील काळात राज साहेब ठाकरे भिवंडी शहराकडे विशेष लक्ष देतील असा विश्वास शहराध्यक्षा मनोज गुळवी यांनी यावेळी व्यक्त केला आहे

Post a Comment

Previous Post Next Post