चंदुरात कै .विशाल माने यांच्या स्मरणार्थ गरीब विद्यार्थीना शालेय बँग वाटप

 

दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

चंदुर : हातकणगंले तालूक्यातील चंदुर येथील माजी शिवसेना शहर प्रमुख कै.विशाल वंसत माने यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिम्मित गावात विवीध कार्यक्रम राबवण्यात आले.कै.विशाल माने चंदुरच्या शहर प्रमुख असताना गावातील 2019 च्या महापुरात अनेक पुरबाधीताना मदत केली होती.

त्याचबरोबर त्यानी महापुरात गावात स्वच्छता मोहीम राबवली होती, अनेक गरजु गरीबांना त्यानी न्याय मिळवुन दिला होता गावच्या अनेक समस्या त्यानी आंदोलनाद्वारे सोडवल्या होत्या.अशी अनेक सामाजिक कामे त्यानी केली होती. त्याचबरोबर गावच्या राजकारणात त्यांचे याोगदान अन्यन साधारण होते. अशा युवा नेत्याचा गेल्या वर्षी त्यांचा अपघात झाला  व  त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ गावातील  सामाजिक कार्य सुरु राहावे यासाठी त्यांचा मित्र वर्ग व परिवार सतत झटत असतो.त्यांच्या प्रथम स्मरणार्थ  आज गावातील जिल्हा परिषदेच्या कुमार विद्या मंदीर व कन्या विद्या मंदीर या शाळेत गरीब विद्यार्थाना शालेय बँगेचे वाटप करण्यात आले .

यावेळी गावातील कुमार विद्यामंदीरचे मुख्याध्यापक,विद्यार्थी, माने परिवार व समाज बांधव आदी सह मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post