कै. नाथबाबा वाळकुंजे जनसेवा विकास आघाडीच्या नेतृत्वाखालील पॅनेलने विक्रमी मताने सर्व जागा जिंकल्यादैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 दानोळी येथील जनसेवा विविध कार्यकारी विकास संस्थेच्या शनिवारी झालेल्या निवडणुकीत कै. नाथबाबा वाळकुंजे जनसेवा विकास आघाडीच्या नेतृत्वाखालील पॅनेलने विक्रमी मताने सर्व जागा जिंकल्या नवनिर्वाचित संचालक आणि पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या निवासस्थानी भेट दिली.

 यावेळी जयसिंगपूर चे उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी सर्व नवनिर्वाचित संचालकांचा यथोचित सन्मान केला यावेळी संस्थेच्या वतीने पैलवान केशव राऊत यांनी उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा सन्मान केला नवनिर्वाचित संचालक मंडळ असे भाऊसो हरी दळवी,अजितकुमार आण्णा पाराज , रमेश जिनाप्पा मल्लाडे, सिताराम परसू माने, केशव कृष्णा राऊत, जनार्दन बाळकृष्ण लोहार, रामचंद्र नाथा वाळकुंजे, परशराम राऊ सावंत, सुगंधा नामदेव धनवडे, रंजना पांडुरंग पोवार, बाबासो बंडू तांबोळी, सुरेश कोळा कलकुटगी,  अनिल शांताराम कांबळे यांच्यासह सुकुमार नेजकर (सर), माणिक जगदाळे, पिटु पाराज, धन्य कुमार पाराज, उदय राऊत, बापुसो नेरकर, नामदेव धनवडे, अविनाश दुधगावे, नितीन लोहार, कुबेर केकले, भीमराव होगले, बबन गावडे, स्वप्निल पवार, राहुल पवार, अमीर घुणके, मिरसाहेब मज्जिद, विश्वास चव्हाण, रमेश मल्लाडे, शशिकांत वाळकुंजे, श्रीधर लंबे, उमेश साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post