फुले , शाहू, आंबेडकर विचारमंच कडून हुमायून नदाफ यांना "युवा पत्रकारिता"- समाज जागृती पुरस्कार २०२१ जाहीर...



दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

हुपरी प्रतिनिधी:— येथील फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच टाकवडे ता. शिरोळच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय समाजकार्य करणाऱ्या मान्यवरांना सन २०२१ यावर्षीचे १६ वे "समाजजागृती पुरस्कार" नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत.                                    

  


  राज्यस्तरीय अनेक पुरस्कार प्राप्त व ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन शाखा हुपरीचे सक्रेटरी युवा पत्रकार  हुमायून नदाफ   यांच्या नावाचा     "युवा पत्रकारिता"  समाज जागृती पुरस्कार (२०२१) साठी  समावेश करण्यात आला आहे.                                              

 सदर पुरस्कार वितरण समारंभ मा.डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर- आरोग्य व सांस्कृतिक राज्यमंत्री यांचे हस्ते व मा. प्रकाश पाटील,टाकवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच संपन्न होणार आहे तसेच पंचायत समिती माजी सभापती व विद्यमान सदस्या अर्चना चौगुले व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती विचारमंचे कार्याध्यक्ष आकाश कांबळे, अशोक कांबळे, रमेश कांबळे, संस्थापक राजेंद्र कांबळे (पत्रकार) यांनी प्रसिध्दि पत्रकाद्वारे दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार