प्रहार संघटनेला मोठं यश ,हुपरी पोस्ट ऑफिस मध्ये गेलेल्या काही वर्षांपासून बंद असलेले आधार केंद्र
प्रहारच्या दणक्यानं झाले सुरु.
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
हुपरी : पंचक्रोशीतील नागरिकांसाठी हक्काचं आधार केंद्र असताना कोल्हापूर-इचलकरंजी सारख्या ठिकाणी आधार कामासाठी नागरिकांची धावपळ व्हायची यातून सामान्य नागरिकांना नाहक आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत होते, या गोष्टी प्रहार सेवकांच्या निदर्शनास येताच आम्ही सर्व प्रहार सेवक श्री.शहाबुद्दीन घुडूभाई (हात.ता.सरचिटणीस) , श्री वैभव झुंजार हातकणंगले .ता.यु.सचिव ,श्री.अनिल गावडे (हुपरी शहर प्रमुख) श्री.शितल कुरले (यळगुड शहरप्रमुख), साहिल रोहिले (हुपरी शहर सचिव) यांनी मिळून पोस्टातील उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रहार स्टाईल दाखवताच त्यांनी आधार केंद्र सुरू करण्याच्या हालचाली करुन आज प्रत्यक्षात कामकाज सुरु होताच काही नागरिकांनी आजचं आधार कामे करून प्रहार संघटनेचे आभार मानले
.येथून पुढे (दि.२५डिसेंबरपासून) पुर्वीनुसार दर शनिवारी २ते४वा.या वेळेत हुपरी पोष्टातील आधार केंद्र सुरु राहणार आहे,तरी हुपरी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी आपली आधार ची कामे करून घ्यावीत व इतरांनी ही सांगावे.
Comments
Post a Comment