हुपरीचा घरफाळा इंचलकरंजी पेक्षा अडीच पट ज्यादादैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

हुपरीचा घरफाळा इंचलकरंजी पेक्षा अडीच पट ज्यादा आहे तरी सुद्धा लोक गप्प गुमान कर भरत आहेत , एक एप्रिल पासून नवीन कर आकारणी सुरू करण्यात येईल असे पत्र नगरपालिकेने हुपरी बचाव कृती समितीला देऊन सुद्धा मनमानी कारभार करत कोणत्याही प्रकारची नागरिकांना सूचना न देता कलम 179 180 प्रमाणे कर निर्धारण यादी जाहीर न करता लोकांच्या हरकती न घेता चतुर वार्षिक कर आकारणी ची कोणतीही प्रोसिजर न पूर्ण करता जबरदस्तीने कर वसुली सण 21 22 ची सुरू करण्यात आली आहे .

 त्या बाबत कोणीही तक्रार नोंदविलेली नाही बघा विचार करा आपण जो कर भरतो तो शासन आपणाला लावत नसते आपल्या नगरपालिकेच्या लोकप्रतिनिधींनी तो कर किती असावा हे ठरवायचे असते लोकांच्या कडून त्याबाबत हरकती घ्यावयाच्या असतात जनरल बॉडी ठराव करून कर निश्चित करावयाचा असतो सन 2012 पासून आज तागायत कोणतीही मोजणी किंवा सर्वे करण्यात आलेला नाही कमीत कमी 2000 मिळकती नगरपालिकेकडे नोंदविण्यात च् आलेल्या नाहीत  सामान्य लोकांच्या कडून कर वसुली जबरदस्तीने सुरू आहे नागरिकांनी याचा  विचार करून कर भरायचा किंवा नाही ते ठरवावे नगरपरिषदेने लेखी दिलेल्या पत्रानुसार सण 21 22 साठी नविन कर आकारणी शासन परिपत्र का प्रमाणे अंमलबजावणी करून मोजणी करून जनरल बॉडी मध्ये ठराव करून लोकांच्या हरकती घेऊन कर वसुली करणे कोणतीही हरकत असण्याचे कारण नाही पण लोकांच्या पर्यंत हा विषयच समजू दिला जात नाही ,याचा हुपरीतील नागरिकांनी पूर्ण विचार करावा असे अशोक खाडे यांनी सांगितले आहे.

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार