राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा हुपरी मनसे तर्फे सत्कार

 दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

हुपरी नगरीला थोर क्रिडा परंपरा आहे. या मातीत अनेक दिग्गज खेळाडू तयार झाले आहेत. हि परंपरा आपण जपत आहात. आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले आहे त्याबद्दल आपले कौतुक करताना अत्यानंद होत आहे असे प्रतिपादन नगरसेवक व मनसेचे तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील यांनी केले आहे.

रविवार दि. १९ डिसेंबर रोजी मनसे प्रधान कार्यालय हुपरी येथे कराटे व नेमबाजी खेळाडूंचा सत्कार करणेत आला त्यावेळी ते बोलत होते.

भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत हुपरीच्या युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली तसेच नेपाळ येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियन्स स्पर्धेत हुपरीच्या युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी केली त्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना हुपरीच्या वतीने सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन सत्कार करणेत आला. अतिशय उत्साहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात मनसे तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील यांचे तसेच मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करणेत आला. यावेळी मनसे हुपरी शहर अध्यक्ष गणेश मालवेकर, विठ्ठलराव पाटील, दिलीपराव विभूते,पत्रकार बाळासाहेब कांबळे, मुबारक शेख  सर, बाबासाहेब गायकवाड, सचिन अथणे, पदमाकर चौगुले, क्रिडा प्रशिक्षक, खेळाडू, पालकवर्ग, मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत सुत्रसंचालन पत्रकार भाऊ खाडे यांनी केले. आभार प्रदर्शन मुबारक शेख सर यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार