वाहतूक संबंधी तात्काळ व्यवस्था न केल्यास

 हुपरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा.


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

हुपरी : येथील जवाहर साखर कारखाना परिसरात  गेल्या दोन दिवसात ऊस वाहतुक  करण्यात येणाऱ्या वाहनांच्या धडकेने दोघांचा बळी गेलेला आहे गेल्या काही वर्षांपासून  कारखाना परिसरात आता पर्यंत पंचवीस जणांचे अपघातात बळी गेले आहेत. याचे कारण नियंत्रित वाहतूक व निष्काळजी पणाने चालविणाऱ्या ट्रक व ट्रॅक्टर चालकांच्या मुळे हे अपघात घडले आहेत. 

इतके होऊनी वाहतुकीबद्दल कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही, रस्ता अरुंद असून कुठेही वाहतूक व्यवस्था व रस्ता रुंदी रुंदीकरणाचे काम करण्यात आलेले नाही. बेजबाबदार चालक व प्रशासनामुळे भविष्यात आणखीन अपघात वाढण्याची शक्यता जास्त आहे. बाबत जर कारखाना प्रशासन विभागाने , हुपरी पोलीस स्टेशन, हुपरी नगर परिषद यांनी  वाहतूक संबंधी तात्काळ  व्यवस्था न केल्यास हुपरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल  असा इशारा हुपरी मुख्याधिकारी , नगराध्यक्ष यांना देण्यात आलेल्या  निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांच्या सह्या आहेत

Post a Comment

Previous Post Next Post