श्री दानम्मा देवी यात्रा उत्साहात संपन्नदैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

इचलकरंजी :-  लोटस पार्क जवळील गौरीशंकर नगर, खोतवाडी येथील श्री दानम्मा देवी व श्री वीरभद्र मंदिराच्या ठिकाणी सालाबाद प्रमाणे *श्री दानम्मा देवी ची यात्रा* अतिशय उत्साहात संपन्न झाली रविवार दिनांक 5 डिसेंबर 2021. रोजी *श्री दानम्मा देवी ची महापूजा* पहाटे 5. 30 वाजता *श्री बाळासाहेब सुतार* उद्योजक व *श्री राजू हरुगेरी* यांच्या शुभहस्ते करण्यात आले.सकळी 11.30 वाजता *दानेश्वरी महिला मंडळाच्या वतीने* आलेल्या सर्व महिलांचे *सुहासने पूजन* करण्यात आले. यानंतर देवीचे आरती होऊन नैवेद्य दाखवण्यात आला व आलेल्या सर्व भक्तांना *महाप्रसादाचे* वाटप करण्यात आले. 

सायंकाळी ठीक 6.00 वाजता *महाआरती* करून *पालखी पूजन* व *दीपोत्सव* साजरा करण्यात आला याप्रसंगी लाभलेले प्रमुख पाहुणे व सामाजिक कार्यकर्ते ऑल इंडिया ह्युमन राईटचे अध्यक्ष व न्याय निवाडा समितीचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच लोक क्रांती विकास आघाडीचे राज्याध्यक्ष *श्री दत्ता मांजरे* यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले व दीपोत्सवासाठी *श्री सतीश शर्मा"* टेक्स्टाईल मॅनेजर व विशाल क्रांती साप्ताहिकाचे संपादक *श्री.आप्पासाहेब भोसले* व परिसरातील भक्त *श्री रत्नाकर हिरेमठ* इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या यात्रेचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री देवेंद्र आमटे, उपाध्यक्ष शिवकुमार मुरतले, सेक्रेटरी इराण्णा मट्टीकल्ली, खजिनदार चिदानंद हलभावी, मंडळाचे संचालक सुभाष घुणकी इराण्णा चचडी, प्रमोद हलभावी, महेश कब्बूर, प्रकाश वरदाई, राजू भावीकट्टी, बाळासाहेब देवनाळ, श्रीशैल बिळूर, शंकर बिळूर, शिवानंद जोतावर, नंदू हेरलगी, राजू हरुगेरी, संतोष हिरुगेरी, रत्नाकर गोमुखी, मल्लिकार्जुन बिळूर, प्रकाश बाळीफडी, विजय बाळीफडी, राजू गोटे, मनोज चचडी, अनिल चचडी, सुनील चचडी, व महिला मंडळाच्या अध्यक्षा सुरेखा बाळीफडी, सेक्रेटरी महानंदा मुरतले, भारती घुणकी, राखी मुरतले, मंजू देवनाळ, गीता बळीफडी, नंदा आमटे, प्रिया वरदाई, कविता बाळीफडी, सुवर्ण कुबसद, नंदा हलभावी, गायत्री मुरतले, शालिनी हालभावी, आरती व्हनकवरे, संयुक्त मुरतले, भारती मुरतले, इत्यादी समाजातील महिला बंधू-भगिनी तसेच इचलरकंजी व परिसरातील श्री दानम्मा देवी चे भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिरातील हिरेमठ पुजारी, पुजारी आंटी, रमेश हिरेमठ पुजारी यांनी मोलाचे सहकार्य केले. श्री दानम्मा देवी ची यात्रा दिवसभर उत्साहात संपन्न झाला.

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार